|| अजय वाळिंबे

पॉवर मेक प्रोजेक्ट्स लिमिटेड ही भारतातील एक आघाडीची पायाभूत सुविधा-बांधकाम कंपन्यांपकी एक इंजिनीयिरग कंपनी आहे. जागतिक बाजारपेठेत उपस्थिती असलेल्या पॉवर मेकचे विद्युत आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील सेवांचे स्पेक्ट्रम उपलब्ध करून देण्याचे श्रेय सर्वाधिक आहे. १५ हजारांहून अधिक कर्मचारी असलेल्या या कंपनीकडे अत्याधुनिक मशीन्स आणि क्रेन्सचा मोठा ताफा असून ती एकाचवेळी ५५ साइट्स कार्यरत करण्यास सक्षम आहे.

कंपनीने बीटीजी आणि बीओपीची उभारणी, चाचणी आणि कार्यान्वयन, ऑपरेशन आणि देखभाल, दुरुस्ती, ओव्हरहॉलिंग, नूतनीकरण व वीजनिर्मितीचे आधुनिकीकरण आणि संबंधित नागरी कामांचा समावेश असलेल्या वीजनिर्मितीत स्वत:चे एक स्थान निर्माण केले आहे. पॉवर मेकची भारतात मोठी कामे असून तिने जागतिक स्तरावरही आपले कामकाज वाढवले आणि जगातील दहापेक्षा जास्त देशांमध्ये कंपनीची उपस्थिती आहे.

गेल्या २० वर्षांत कंपनीने अल्ट्रा मेगा पॉवर प्रोजेक्ट्स, सुपर क्रिटिकल थर्मल पॉवर प्रोजेक्ट्स, सब क्रिटिकल पॉवर प्रोजेक्ट्स, हीट रिकव्हरी स्टीम जनरेटर, कचरा उष्णता पुनप्र्राप्ती असे अनेक प्रकल्प भारत व परदेशात हाती घेतले आहेत. स्टीम जनरेटर, फ्लोईज्ड बेड दहन अभिसरण स्टीम जनरेटर, गॅस टर्बाईन जनरेटर, जल विद्युत प्रकल्प, चालू असलेल्या प्रकल्पांचे संचालन व देखभाल आणि विद्युत प्रकल्पांसाठी संपूर्ण नागरी कामे. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कंपनीने साहाय्यक कंपन्या स्थापन केल्या आहेत.

जून २०१९ अखेर समाप्त तिमाहीसाठी जाहीर केलेल्या आíथक निष्कर्षांप्रमाणे कंपनीने ४७०.२३ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २६.४६ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो ५४ टक्क्यांनी अधिक आहे. आगामी कालावधीतदेखील कंपनीकडून भरीव कामगिरीची अपेक्षा आहे. भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सरकारकडून पायाभूत सुविधा आणि बांधकाम क्षेत्राला झुकते माप मिळाले आहे. अजून पाच वर्षे इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रासाठी उत्तम असतील. एक मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून पॉवर मेकचा जरूर विचार करा.

सूचना :

  1. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.
  2. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.