बुधवारी सायंकाळी पाल्र्यात तज्ज्ञांकडून गुंतवणूक मार्गदर्शन
मुलांच्या उच्च शिक्षणासाठी तरतूद, घर-गाडी-बंगला ही मनांत जपलेली स्वप्नं साकारायची तर गुंतवणूक करावीच लागेल. तर मग उत्पन्न व खर्चाचा मेळ घालून दरमहा किती बचत यासाठी करावी आणि हा पैसा गुंतवायचा तर तो नेमका कुठे? अशा सर्वसामान्यांना पडणाऱ्या प्रश्नांची उकल करणारा उमद्या गुंतवणुकीच्या, चांगल्या सल्ल्याच्या ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ उपक्रमाला येत्या बुधवारपासून पुन्हा सुरुवात होत आहे.
‘रिलायन्स म्युच्युअल फंड’ प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थसल्ला’चा हा मार्गदर्शनपर कार्यक्रम येत्या बुधवारी, ६ जुलै रोजी सायंकाळी ६.०० वाजता पु. ल. देशपांडे सभागृह, लोकमान्य सेवा संघ, तिसरा मजला, राम मंदिर रोड, विलेपार्ले (पूर्व) येथे होत आहे.
‘आर्थिक नियोजनातून स्वप्नपूर्ती’ या विषयावर गुंतवणूक सल्लागार मिलिंद अंध्रुटकर, तर ‘म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे फायदे’ या विषयावर अर्थनियोजनकार तेजस्विता चौधरी यांचे मार्गदर्शन होईल. सोप्या भाषेत, सुबोध उदाहरणांसह, तज्ज्ञांकडून या उपक्रमांतून दिले जाणारे मार्गदर्शन उपस्थितांना निश्चितच उपयुक्त ठरेल. शिवाय आपले नेमके प्रश्न त्यांना तज्ज्ञांना विचारण्याची संधीही मिळेल. कार्यक्रमाला प्रवेश खुला आणि विनामूल्य आहे.
केव्हा, कुठे?
बुधवार, ६ जुलै २०१६, वेळ : सायं. ६ वाजता
स्थळ : पु. ल. देशपांडे सभागृह, लोकमान्य सेवा संघ, विलेपार्ले (पूर्व)
मार्गदर्शक : मिलिंद अंध्रुटकर आणि तेजस्विता चौधरी
प्रवेश : विनामूल्य, प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य.