जुल महिन्याच्या अतिथी विश्लेषक श्रेया मुझुमदार या सनदी लेखापाल असून समभाग संशोधनाचा त्यांचा आठ वर्षांचा अनुभव आहे. सध्या त्या ‘ब्लू हेवन कॅपिटल’ या दलाल पेढीत ‘मिड-कॅप’ विश्लेषक आहेत. गुरुवारी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाच्या लाभार्थी कंपन्या या महिन्यात सुचवीत आहेत.
‘धनुका अॅग्रिटेक लिमिटेड’ ही देशातील एक प्रमुख कृषी रसायन उत्पादक आहे. कंपनीची स्थापना १९८० मध्ये एक आजारी कंपनी ताब्यात घेऊन झाली. एम. के. धनुका हे या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. कीटकनाशक रसायने, तणनाशक रसायने, बुरशीनाशक रसायने, द्रवरूप, स्फटिकरूप, पावडररूप खाद्यान्न ही कंपनी तयार करते. कंपनीचे देशभरात ७५ हजार विक्रेते आहेत. १० लाखांहून अधिक ग्राहक आहेत. कंपनीने अमेरिकेतील ४, जपानी ५ व २ युरोपमधील कंपन्यांबरोबर विशिष्ट उत्पादनासाठी तांत्रिक सहकार्याचे करार केले आहेत. कंपनीने तिन्ही प्रकारच्या उत्पादनांचे संतुलन साधले आहे. २०१३-२०१४ च्या विक्रीत कीटकनाशके, तणनाशके व बुरशीनाशके रसायनांचा वाटा अनुक्रमे ४३ टक्के, ३२ टक्के व १४ टक्के आहे. तर इतर रसायनांचा वाटा ११ टक्के आहे.
कृषी रसायनांची जागतिक बाजारपेठ जानेवारी ते डिसेंबर २०१२ मध्ये ४७ अब्ज डॉलर इतकी राहिली असून, बाजारपेठेची वाढ ५ टक्के दराने झाली. कृषी रसायन बाजारपेठेत कृषी संरक्षण रसायनांचा मोठा वाटा असून ही रसायने नाममुद्रेने व व्यापारी नावाने (ॅील्ली१्रू२) विकली जातात. बायर, सिजेन्टा, बीएएसएफ, मॉन्सेन्टो, डय़ुपौंड, डाव केमिकल्स या उद्योगातील आघाडीच्या कंपन्या आहेत. ही बाजारपेठ पेटंट व व्यापारी नावाने विकली जाणारी रसायने अशा दोन गटांत विभागली आहे. या व्यवसायात टोळधाड व अन्य रोगांची लागण झाली असता, साधारणत: ५० टक्के पिके वाचविली जाऊ शकतात. यापेक्षा अधिकपणे वाचविणे शक्य होत नाही. म्हणून शेतकऱ्यांची पसंती जेनेरिक कीटकनाशकांना असते. बाजारपेठेत पेटंट उत्पादनाचा वाटा २५ टक्के आहे. हा वाटा टप्प्याटप्प्याने वाढणार आहे. तर भारताची कृषी रसायनांची बाजारपेठ १२५ अब्ज रुपये इतकी असून २००१ ते २०१३ या काळात बाजारपेठ ८ टक्क्यांनी वाढली आहे. सरकारने वेळोवेळी अन्नधान्याच्या आधारभूत किमतीत केलेली वाढ व खाद्यान्नाची वाढती मागणी लक्षात घेता कृषी रसायनांची मागणी वाढतच जाणार आहे. आगामी पाच वर्षांत कृषी रसायनांची बाजारपेठ १२ टक्क्यांनी वाढेल. भारतात कृषी रसायनांचा वापर जागतिक सरासरी वापरापेक्षा खूपच कमी आहे. कृषी रसायनांचा वापर करण्यात दक्षिण व पश्चिम भारतातील राज्ये आघाडीवर आहेत, तर तांदूळ व कापूस ही विविध रोगांना बळी पडणारी पिके असल्याने ही पिके घेणारे शेतकरी या रसायनाचा सर्वाधिक वापर करतात. एका बाजूला वाढत्या नागरीकरणामुळे शेतीखालील जमीन कमी होत आहे, तर दुसऱ्या बाजूला वाढत्या लोकसंख्येमुळे अन्नधान्याची मागणी वाढत आहे. यामुळे सरकारची धोरणे प्रति एकर धान्य उत्पादन वाढविण्यावर आहे. वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी कंपनीने राजस्थानात चौथ्या प्रकल्पाची उभरणी सुरू केली असून, या आíथक वर्षांच्या चौथ्या तिमाहीत या प्रकल्पातून व्यापारी उत्पादनास प्रारंभ होईल.
भारताच्या कृषी रसायन बाजारपेठेत धनुका अॅग्रिटेकचा वाटा ६ टक्के आहे. ८ हजार वितरक व ७५ हजार विक्रेते यामार्फत देशाच्या ८५ टक्के जिल्ह्य़ांतील १० लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कंपनीने आपली वितरण व्यवस्था उभी केली आहे. हे भारतातील हिदुस्थान युनिलिव्हर नंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे वितरकांचे जाळे असल्याचा दावा कंपनीने वार्षकि निकालानंतर घेतलेल्या विश्लेषकांच्या परिषदेत केला. कंपनीने अमिताभ बच्चन यांच्याशी आपल्या उत्पादनासाठी सदिच्छा दूत म्हणून नेमणूक करण्याचा करार केला असून ‘हर किसान की खुशी के लिये..’ या जाहिराती छोटय़ा पडद्यावर झळकू लागल्या आहेत. कंपनीने कृषी पदवीधरांची नेमणूक केली असून त्यांच्यामार्फत ‘धनुका खेती की नयी तकनिक’ या मालिके अंतर्गत कृषी रसायनांचा वापर कसा असावा, हे ‘धनुका खेती डॉक्टर’ समजावून सांगत आहेत. या कृषी – डॉक्टर योजनेवरचा खर्च कंपनी पुढील दोन वर्षांत दुप्पट करणार आहे. कंपनीने आपला कृषी रसायन क्षेत्रातील वाटा पुढील पाच वर्षांत दुप्पट करण्याच्या योजना आखल्या आहेत. कंपनीने सहा नवीन उत्पादने विकसित केली असून त्यापकी दोन उत्पादने या आíथक वर्षांत विक्रीसाठी उपलब्ध होतील. उर्वरित चार उत्पादने दरवर्षी टप्प्याटप्प्याने विक्रीसाठी उपलब्ध होतील. यापकी दोन उत्पादने भारतात पहिल्यांदाच उपलब्ध होणार असून, या उत्पादनांची कीटकनाशक कायदा १९६८च्या कलम ९ (३) अंतर्गत नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे.
सध्या या कलमाखाली नोंदणी झालेले कंपनीचे एकच उत्पादन उपलब्ध आहे. ही संख्या या नवीन उत्पादनांच्या नोंदणीनंतर दुप्पट होणार आहे. या कीटकनाशक कायद्यांतर्गत नोंदणी झालेल्या उत्पादनांची नफा क्षमता उर्वरित उत्पादनांच्या दुप्पट असते. सध्या कंपनीचे या कलमाखाली नोंदणी केलेले ‘लस्टर’ हे उत्पादन सर्वाधिक विक्री असलेल्या पहिल्या १० कीटकनाशकांच्या यादीत आहे. कंपनीने निवडक उत्पादने कीटकनाशक कायदा १९६८ च्या कलम ९ (४) खाली नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
(बीएसई कोड – ५०७७१७)
” ४२९.१५
वार्षिक उच्चांक/नीचांक : “४६७/१२५.३०
दर्शनी मूल्य : ” २
पी/ई : १५.८१ पट
मूल्यांकन : चालू आíथक वर्षांत कंपनीची विक्री २४ टक्क्यांनी तर करपश्चात नफा २६.९ टक्क्यांनी वाढेल, तर आíथक वर्ष २०१४-१५ मध्ये नवीन विकसित केलेली उत्पादने नफा क्षमता वाढवतील. कंपनीचा राजस्थान प्रकल्प या वर्षांत सुरू होईल. सध्याच्या भावाचे २०१५च्या प्रति समभाग उत्सर्जनाशी गुणोत्तर १५.८१ पट, तर २०१६च्या उत्सर्जनाशी गुणोत्तर १०.८७ पट आहे. पुढील एका वर्षांत रु. ४९०चे लक्ष्य निश्चित करून खरेदीची शिफारस करावीशी वाटते. मूल्यांकन चालू आíथक वर्षांत कंपनीची विक्री २४ टक्क्यांनी, तर करपश्चात नफा २६.९ टक्क्यांनी वाढेल, तर आíथक वर्ष २०१४-१५ मध्ये नवीन विकसित केलेली उत्पादने नफाक्षमता वाढवतील. कंपनीचा राजस्थान प्रकल्प या वर्षांत सुरू होईल. सध्याच्या भावाचे २०१५च्या प्रति समभाग उत्सर्जनाशी गुणोत्तर १५.८१ पट तर २०१६च्या उत्सर्जनाशी गुणोत्तर १०.८७ पट आहे. पुढील एका वर्षांत रु. ४९०चे लक्ष्य निश्चित करावे.
संग्रहित लेख, दिनांक 7th Jul 2014 रोजी प्रकाशित
हर किसान के खुशी के लिये..
जुल महिन्याच्या अतिथी विश्लेषक श्रेया मुझुमदार या सनदी लेखापाल असून समभाग संशोधनाचा त्यांचा आठ वर्षांचा अनुभव आहे.

First published on: 07-07-2014 at 01:03 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: For the pleasure of every farmer