आली दिवाळी म्हटले की कुठे तरी बाहेर फिरायला जाणे आलेच. अगदी वर्षांच्या सुरुवातीपासून या सुट्टी व सहलीबाबत योजना सुरू असतात. सुट्टीची योजना बनविण्यामध्ये आपण जेवढा वेळ देतो, तेवढा आपली वित्तीय लक्ष्ये ठरविण्यासाठीही आपण देत नाही. तथापि, सुट्टीची योजना आखणे खूप सोपे आहे, कारण तुम्हाला माहीत असते की कुठे जायचे आहे, कधी जायचे आहे व तुमच्याकडे किती वेळ आहे आणि तुम्ही आणखी किती वेळ देऊ शकता.. वगैरे. परंतु, म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करणे हे सुट्टीची योजना आखण्याइतपत सोपे नाही.
जास्तीत जास्त लोक म्युच्युअल फंडांचा केवळ इक्विटी म्हणून विचार करतात. खरे तर, म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूकदारांना सादर करण्यात येणाऱ्या उपायांचे बरेच प्रकार आहेत. जसे की, इक्विटी फंडस् (लार्ज कॅप, मिड कॅप, विविधीकृत, थीमॅटिक इत्यादी), फिक्स्ड इन्कम फंड (लिक्विड, शॉर्ट, डायनॅमिक, सरकारी सिक्युरिटीज फंड, एफएमपी इत्यादी) आणि हायब्रिड फंड (बॅलन्स्ड आणि एमआयपी). यापकी प्रत्येक फंड गुंतवणूकदारांना त्यांच्या आर्थिक लक्ष्यापर्यंत पोहोचविण्यात मदत करू शकतो. तथापि, योग्य गुंतवणुकीकरिता सर्वप्रथम गुंतवणूकदाराने आपले लक्ष्य ठरविले पाहिजे आणि मग ते प्राप्त करण्याचा मार्ग बनवला पाहिजे.
खाली काही प्रश्न देण्यात आले आहेत, जे वाचकांना त्यांच्या गुंतवणूक-भांडारात म्युच्युअल फंडांच्या योग्य मिश्रणाची ओळख करण्यामध्ये मदत करतील.
१. मी कुठे आहे? आणि मला कुठे पोहोचायचे आहे?
– ज्या वेळी तुम्ही आपल्या वित्तीय योजना आखायला सुरुवात करता, तेव्हा आपला सध्याचा पोर्टफोलिओ आणि अॅसेट मिक्सवर लक्ष देणे सर्वात महत्त्वपूर्ण आहे. एकदा विचार करा की, तुम्ही आता किती इन्स्ट्रमेंट्समध्ये गुंतवणूक करीत आहात? इक्विटी, फिक्स्ड इन्कम आणि गोल्ड यांमध्ये सध्या गुंतवणुकीचे प्रमाण काय आहे? त्यानंतर, आपली प्रमुख आर्थिक लक्ष्ये आणि प्रत्येक लक्ष्याची लक्षित व्हॅल्यू नोट करा. तुमचे लक्ष्य आपल्या स्वप्नातील घर खरेदी करणे, नवीन कारकरिता बचत करणे, आपल्या मुलाचे उच्च शिक्षण किंवा लग्नाच्या खर्चाकरिता बचत करणे इत्यादी असू शकतात.
२. मी या लक्ष्यांपर्यंत कधीपर्यंत पोहोचेन?
– तुम्ही ठरविलेल्या प्रत्येक लक्ष्याची वेळ निश्चित करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या वेळेविषयी स्पष्टता राहील. हे कार्य निवडण्यात येणाऱ्या फंडाच्या प्रकाराशी महत्त्वपूर्ण संबंध ठेवते. इक्विटी फंड मोठय़ा कालावधीची लक्ष्ये (१० पेक्षा जास्त वष्रेकरिता) सर्वोत्कृष्ट आहेत, तर हायब्रिड फंड मध्यम कालावधीची लक्ष्ये (४-८ वष्रे) आणि कन्झव्र्हेटिव्ह फिक्स्ड इन्कम फंड पुढील २-३ वर्षांकरिता ठरविण्यात येणाऱ्या लक्ष्यांकरिता योग्य असतात.
३. लक्ष्याची रक्कम काय आहे?
– प्रत्येक लक्ष्याच्या लक्षित व्हॅल्यूची गणना जरूर करा आणि हिला आपले लक्ष्य यशस्वीपणे पूर्ण करण्याकरिता आवश्यक रक्कमेपर्यंत पोहोचण्याकरिता योग्य चलनवाढीच्या दराप्रमाणे वाढवत जा. उदाहरणार्थ, जर तुम्ही तीन वर्षांच्या कालावधीमध्ये एका कारकरिता बचत करत आहात, जिची किंमत आता ५ लाख रुपये आहे, तर कारच्या किमतींमध्ये ५ टक्क्यांच्या चलनवाढीचा अंदाज लावत तुम्हाला ३ वर्षांच्या शेवटपर्यंत ५.७९ लाख रुपये जमा करण्याचे लक्ष्य ठरविले पाहिजे
४. किती गुंतवणूक करू शकता?
– साधारणपणे लोकांना एकरकमी गुंतवणूक करायला आवडते (एफडी, विमा प्रिमियम इत्यादी). जास्तीत जास्त केसेसमध्ये गुंतवणुकीकरिता एक रक्कम एका निश्चित वेळेमध्ये जमा करावी लागते. लोकांनी हा विचार केला पाहिजे की, जर ते नियमितपणे पसे खर्च करू शकतात, तर त्यांनी गुंतवणूकदेखील नियमित केली पाहिजे. सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) नियमित गुंतवणूक सुरू करण्याचा उत्कृष्ट विकल्प आहे. एसआयपी खिशावर जास्त ताण देणार नाही आणि त्याबरोबरच एकरकमी गुंतवणुकीची जोखीमदेखील कमी करेल. हे शिस्तबद्ध गुंतवणुकीच्या दृष्टिकोनालादेखील प्रोत्साहन देते.
एसआयपी गुंतवणुकीकरिता, तुम्ही मोठय़ा कालावधीच्या सरासरी एसआयपी रिटर्नवर ग्रोथ रेटचा अंदाज लावून तपासा की तुम्ही पुरेशी बचत करत आहात का? उदाहरणार्थ, लार्ज कॅप फंडांनी मागील १० वर्षांमध्ये १४-१५ टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. बॅलन्स्ड फंडाने १२.५ टक्के, तर एमआयपी आणि इन्कम फंडांनी ७.५-८ टक्क्यांचा एसआयपी रिटर्न दिला आहे.
जर तुमची बचत पुरेशी नसेल तर, एसआयपी रक्कमेमध्ये दरवर्षी साधारण वाढ करून ही तफावत भरून काढता येऊ शकते.
५. जोखीम घेण्याची क्षमता काय आहे?
– सर्वोच्च रिटर्न (जसे इक्विटीज) सादर करणाऱ्या संपत्ती वर्गामध्ये आपल्या गुंतवणुकीची रक्कम लावणे आकर्षक होऊ शकते. परंतु, आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेप्रमाणे गुंतवणूक करणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हे विविध कारक जसे की, वय, सध्याची बचत, लक्ष्य प्राप्त करण्याचा काळ इत्यादींवर अवलंबून असते. म्हणूनच, जर कुणी एका वर्षांनंतर कार खरेदी करण्यासाठी बचत करत आहे, तर त्याला २० वर्षांनंतर आपल्या सेवानिवृत्तीकरिता बचत करणाऱ्याच्या तुलनेत कन्झव्र्हेटिव्ह गुंतवणूक मिक्समध्ये जास्त गुंतवणूक करावी लागेल.
६. विविध फंडस् व सुविधांच्या संयोजनाची आवश्यकता आहे का?
– गुंतवणूकदारांकरिता आपल्या गुंतवणुकीचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करण्याकरिता सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी), सिस्टेमॅटिक ट्रान्सफर प्लॅन (एसटीपी) आणि सिस्टेमॅटिक विथड्रॉवल प्लॅन (एसडब्ल्यूपी) यांसारख्या विकल्पांचा वापर समजणे आवश्यक आहे. म्हणूनच, सेवानिवृत्तीसारख्या मोठय़ा कालावधीच्या लक्ष्याकरिता बचत करण्यासाठी इक्विटीमध्ये एसआयपीचा वापर आदर्श आहे. त्यानंतर सेवानिवृत्तीची तारीख आल्यावर एसटीपीचा वापर करून कमी जोखमीच्या फिक्स्ड इन्कम फंडांकडे वळले पाहिजे. सेवानिवृत्तीनंतर एसडब्ल्यूपीचा वापर करत आपले खर्च पूर्ण करण्याकरिता रक्कम काढता येऊ शकते.
शेवटचे म्हणजे विश्वासार्ह गुंतवणूक पार्टनरची निवड करणेदेखील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे! जर तुम्ही गुंतवणुकीकरिता आवश्यक फंडाच्या प्रकारांबाबत संपूर्णपणे सुस्पष्ट असाल तर त्यानंतर त्या वर्गामध्ये फंडाच्या ट्रक रेकॉर्डवर जरूर लक्ष द्या. अशा फंडांची निवड करा, ज्यांचे प्रदर्शन मोठय़ा कालावधीपासून अनुकूल राहिले आहे. जर आवश्यक असेल, तर गुंतवणूक सल्लागाराच्या सेवांचा वापर करा, जे तुमच्या वित्तीय लक्ष्यांना पूर्ण करण्याकरिता तुमच्या गुंतवणूकीची योजना आखण्यामध्ये मदत करू शकतात.
लेखक बिर्ला सन लाइफ अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे सह-मुख्य गुंतवणूक अधिकारी आहेत
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना त्यांच्या आर्थिक लक्ष्यापर्यंत पोहोचविण्यात मदत करू शकतो. तथापि, योग्य गुंतवणुकीकरिता सर्वप्रथम गुंतवणूकदाराने आपले लक्ष्य ठरविले पाहिजे आणि मग ते प्राप्त करण्याचा मार्ग बनवला पाहिजे.
