पीएनबी गिल्ट्स ही पंजाब नॅशनल बँकेची अंगिकृत उपकंपनी असून कंपनीच्या एकूण भागभांडवलापकी ७४% भांडवल हे या राष्ट्रीयीकृत बँकेचे आहे. भारतातील रोखे बाजारातील रिझर्व बँकेकडून प्राथमिक डिलरशिपचा परवाना मिळवणारी ही पहिलीच कंपनी असावी. गेली १७ वर्ष या व्यवसायात असल्याने पीएनबी गिल्ट्सचा ग्राहक वर्ग मोठा आणि विविध क्षेत्रातील आहे. यात प्रामुख्याने भविष्य निर्वाह निधीचे ट्रस्ट, ग्रामीण सहकारी बँक, सहकारी बँका, मोठय़ा कंपन्या आदींचा समावेश आहे. प्रायमरी डीलर असल्याने
कंपनी सरकारी कर्ज रोखे, ट्रेझरी बिल्स, विविध राज्य सरकारी रोखे, कंपन्या आणि बँक रोखे यात उलाढाल करतेच पण त्या खेरीज कमíशयल पेपर्स, मुदत प्रमाणपत्रे इ. विविध मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्समध्ये देखील उलाढाल करते. गेले काही महिने सातत्याने पडणाऱ्या कच्च्या तेलाच्या किमतीमुळे आपली चलनवाढ आटोक्यात आली असून दीर्घ कालावधीनंतर प्रथमच रिझर्व बँकेने पतधोरणाच्या आधीच रेपो दरात कपात करून आगामी काळ हा व्याज कपातीचा असण्याचे संकेत दिले. येत्या वर्षभरात बँक दर आणि रेपो दर या दोहोंत कपात झाल्यास सर्वच डेट फंड्स तसेच गिल्ट फंड्स यांना चांगले दिवस येणार आहेत. या वर्षांत चलनवाढ आटोक्यात म्हणजे ६% च्या आसपास राहील अशी अपेक्षा आहे. साहजिकच व्याजदरात कपात होण्याची शक्यता आहे. सध्या मुख्यत्वे सरकारी रोखे आणि स्थिर उत्पन्न देणाऱ्या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या या कंपनीचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल उत्कृष्ट आहेत. डिसेंबर २०१४ साठी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने १२२.६४ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३६.७ कोटी रूपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या तिमाहीच्या तुलनेत तो १३२% ने जास्त आहे. येत्या आíथक वर्षांत कंपनीकडून उत्तम कामगिरी अपेक्षित असून सध्या पुस्तकी मूल्यापेक्षाही कमी बाजारभावात उपलब्ध असलेला हा समभाग येत्या १२-१८ महिन्यांत गुंतवणूकदारांना २०-२५% परतावा देऊ शकेल.
सूचना: लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्स मध्ये कुठलीही गुंतवणूक नाही तसेच या कंपनीशी कुठलाही संबंध नाही. सुचवलेल्या कंपनी कडून लेखकाने कुठलेही मानधन घेतलेले नाही.
संग्रहित लेख, दिनांक 16th Feb 2015 रोजी प्रकाशित
निम्न व्याजदर पर्वाचा लाभार्थी
पीएनबी गिल्ट्स ही पंजाब नॅशनल बँकेची अंगिकृत उपकंपनी असून कंपनीच्या एकूण भागभांडवलापकी ७४% भांडवल हे या राष्ट्रीयीकृत बँकेचे आहे.
First published on: 16-02-2015 at 01:07 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pnb guilts ltd