scorecardresearch

बाजाराचा तंत्र-कल : पोशिंदेच हवालदिल!

आजच्या घडीला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील म्युच्युअल फंड हे महागाई, इंधनदर वाढ, कर्जावरील वाढीव व्याजदर या समस्यांमुळे धास्तावले आहेत.

आशीष ठाकूर ashishthakur1966@gmail.com

शिवचरित्रात अजरामर झालेल्या पावनिखडीतील प्रसंगात शिवभक्त बाजीप्रभू देशपांडे यांचे ऐतिहासिक वाक्य आहे..‘‘लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा मरता कामा नये’’

आपल्याकडे बाजाराचे पोशिंदे म्हणजे परदेशी गुंतवणूकदार संस्था, भारतीय म्युच्युअल फंड, विमा कंपन्या व अतिउच्च उत्पन्न गटात मोडणारे गुंतवणूकदार. या पोिशद्यांवरच बाजाराची दारोमदार अवलंबून असते. आजच्या घडीला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील म्युच्युअल फंड हे महागाई, इंधनदर वाढ, कर्जावरील वाढीव व्याजदर या समस्यांमुळे धास्तावले आहेत. याच घटकांचा थेट परिणाम म्हणून परदेशी गुंतवणूकदार संस्थांनी खूप आधीच भारतात सपाटून विक्रीचा मार्ग अवलंबिला. त्यामुळे निफ्टी निर्देशांकावरील १७,०००-१६,००० चे भरभक्कम आधार तुटले. आताच्या घडीला बाजाराचे ‘पोशिंदे’च राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक निराशाजनक घटनांमुळे हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळूया.

गेल्या लेखात एक महत्त्वाचे वाक्य होते झ्र् ‘निफ्टी निर्देशांकाने सातत्याने प्रथम १६,४०० ते १६,००० चा स्तर राखण्याची नितांत गरज आहे, तरच मंदीच्या वातावरणातील ‘तेजीची झुळूक’ संभवते अन्यथा निफ्टी निर्देशांक १६,००० चा स्तर राखण्यास अपयशी ठरल्यास निफ्टी निर्देशांकाचे खालचे लक्ष्य १५,७०० ते १४,५०० असेल.’ सरलेल्या सप्ताहातील गुरुवारी आणि शुक्रवारी निफ्टी निर्देशांकांने १५,७३५ चा नीचांक नोंदवत आपले १५,७०० चे खालचे लक्ष्य साध्य केले. त्यानंतर अतिशय क्षीण स्वरूपाची दिवसांतर्गत सुधारणा १६,०८० पर्यंत झाली. पण या स्तरावर पुन्हा सपाटून विक्री झाल्याने निफ्टी निर्देशांक १६,००० चा स्तर राखण्यात अपयशी ठरलेच, पण १५,७८२ चा साप्ताहिक बंद त्याने दिला.

या आठवडय़ात निफ्टी निर्देशांकाने १५,५०० चा स्तर राखल्यास या निर्देशांकाचे प्रथम वरचे लक्ष्य हे १६,१०० व द्वितीय लक्ष्य १६,३०० ते १६,५०० असे असेल.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स :  ५२,७९३.६२ 

निफ्टी :   १५,७८२.१५

निकालपूर्व विश्लेषण

आयटीसी लिमिटेड      

तिमाही वित्तीय निकाल – बुधवार, १८ मे   

१३ मेचा बंद भाव – २५८.६० रु. 

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – २५० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २७० रुपये, द्वितीय लक्ष्य २९० रुपये.

ब) निराशादायक निकाल :    २५० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत २२५ रुपयांपर्यंत घसरण

गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स

तिमाही वित्तीय निकाल – गुरुवार,   १९ मे        

१३ मेचा बंद भाव – ७९७.२० रु.  

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू  स्तर – ७५०रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ७५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ८३० रुपये, द्वितीय लक्ष्य ९०० रुपये.

ब) निराशादायक निकाल :  ७५० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ७१० रुपयांपर्यंत घसरण.

अशोक लेलँड लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल- गुरुवार,१९ मे        

१३ मेचा बंद भाव – १२२.६० रु.  

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ११८ रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ११८ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १२७ रुपये, द्वितीय लक्ष्य १४० रुपये.

ब) निराशादायक निकाल :  ११८ रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत १०० रुपयांपर्यंत घसरण.

पिडीलाईट इंडस्ट्रीज लि.

तिमाही निकाल – बुधवार,१८ मे       

१३ मेचा बंद भाव – २,१२१.७५ रु.  

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – २,१३० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २,१३० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,३७० रुपये, द्वितीय लक्ष्य २,४४० रुपये.

ब) निराशादायक निकाल : २,१३० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत १,९८० रुपयांपर्यंत घसरण.

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

* लेखक भांडवली बाजार विश्लेषक

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त ( Arthvrutant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Stock market analysis for this week stock market technical analysis zws