आशीष ठाकूर ashishthakur1966@gmail.com

रशिया-युक्रेन युद्धज्वर, त्यातून भडकलेले खाद्य-इंधन तेलाचे दर जे पर्यायाने भाववाढ, चलनवाढीच्या प्रत्यक्ष वणव्यात तेल ओतत होते. या सर्व निराशाजनक घडामोडीत निफ्टी निर्देशांक १७,००० चा स्तर कसाबसा राखत होता. सरलेल्या सप्ताहातील बुधवारी चलनवाढ काबूत आणण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने रेपो दरात ४० आधार बिंदूची वाढ आणि रोख राखीव प्रमाणात (सीआरआर) ५० आधार बिंदूची वाढ या दोन आर्थिक निर्णयांमुळे अर्थव्यवस्थेतील खेळता पैसा शोषून घेणं हा मुख्य उद्देश. पण या उपाययोजनांमुळे समाजातील विविध थरातील गरजवंतांना कर्ज महागल्याने, अगोदरच्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय निराशाजनक घटनांमध्ये रिझव्‍‌र्ह बँकेकडून कर्ज महाग केले जाण्याच्या घोषणेची दाहकता ही ‘उंटाच्या पाठीवरील शेवटची काडी’ ठरली. त्यातून निफ्टी निर्देशांकाने १७,००० चा ‘महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर’ तोडत मंदीच्या गर्तेत प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळूया.

गेल्या वर्षभरापासून आपण निफ्टी निर्देशांकावर १७,००० ते १७,२०० हा स्तर ‘महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर’ म्हणून डोळय़ासमोर ठेवून आपण निफ्टी निर्देशांकावरील ‘तेजी-मंदी’ची आखणी करत होतो, व आजही हा स्तर काळाच्या कसोटीवर उतरत, गुंतवणूकदारांना आजही मार्गदर्शक ठरत आहे.

मंदीच्या दिवसात निफ्टी निर्देशांक १७,००० ते १७,२००चा स्तर सातत्याने राखत असल्यास सर्व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आर्थिक निराशाजनक घटना या त्या क्षेत्रापुरत्या मर्यादित राहत, किंबहुना त्या ‘चहाच्या पेल्यातील’ वादळ ठरत बाजारावर त्याचा विपरीत परिणाम होत नसे एवढी क्षमता निफ्टी निर्देशांकाच्या १७,००० ते १७,२०० च्या स्तराला होती.

सरलेल्या सप्ताहातील बुधवारी ‘रिझव्‍‌र्ह बँके’ने अकल्पितपणे कुठलीही पूर्वकल्पना न देता, दिलेल्या कर्जावरील व्याजदर वाढीच्या दणक्यासोबत अगोदरच्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय निराशाजनक घटनांचे संचित कर्म एकत्रपणे उभे ठाकत निफ्टी निर्देशांकाने १७,०००चा स्तर तोडत त्याची घसरण सुरू झाली.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ५४,८३५.५८ 

निफ्टी :  १६,४११.२५

निफ्टी निर्देशांकाच्या भविष्यकालीन वाटचालीचा आढावा –

निफ्टी निर्देशांकाने सातत्याने प्रथम १६,४०० ते १६,००० चा स्तर राखण्याची नितांत गरज आहे. असे घडल्यास निफ्टी निर्देशांकावर मंदीच्या वातावरणातील ‘तेजीची झुळूक’अपेक्षित आहे. त्या समयी निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य हे १६,७०० ते १७,००० असेल. येणाऱ्या दिवसात निफ्टी निर्देशांकाचा परीघ हा १६,२०० ते १६,८०० मध्ये असेल. या स्तरादरम्यानची पायाभरणी निफ्टी निर्देशांकाची भविष्यकालीन वाटचाल निश्चित करेल. निफ्टी निर्देशांकाने १६,२००चा स्तर राखला आणि १६,८०० चा स्तर पार केल्यास १७,००० ते १७,२०० हे त्याचे वरचे लक्ष्य असेल.

निफ्टी निर्देशांक १६,००० चा स्तर राखण्यास अपयशी ठरल्यास निफ्टी निर्देशांकाचे खालचे लक्ष्य १५,७०० ते १४,५०० असेल.

निकालपूर्व विश्लेषण

एशियन पेंट्स लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल : मंगळवार,१० मे      

६ मेचा बंद भाव – ३,०१६.६० रु. 

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ३,०७० रु.

अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून ३,०७० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३,१५० रुपये, द्वितीय लक्ष्य ३,२५० रुपये.

ब) निराशादायक निकाल: ३,०७० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत २,७०० रुपयांपर्यंत घसरण

लार्सन अँण्ड टुब्रो लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल : गुरुवार,१२ मे

६ मेचा बंद भाव :- १,६२२.६० रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर- २,१३० रु.

अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून १,७५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,८३० रुपये, द्वितीय लक्ष्य १,९८० रुपये.

ब) निराशादायक निकाल: १,७५० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत १,५०० रुपयांपर्यंत घसरण

सीमेन्स लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल : गुरुवार,१२ म     

६ मेचा बंद भाव – २,२१७.३० रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – २,२७० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २,२७० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,३५० रुपये, द्वितीय लक्ष्य २,४५० रुपये

ब) निराशादायक निकाल : २,२७० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत २,०५० रुपयांपर्यंत घसरण

टाटा मोटर्स लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल : गुरुवार,१२ मे

६ मेचा बंद भाव – ४०८.७० रु. 

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ४२२ रु. 

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ४२२ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ४५० रुपये, द्वितीय लक्ष्य ४६५ रुपये.

ब) निराशादायक निकाल : ४२२ रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ३७५ रुपयांपर्यंत घसरण.

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक