28 February 2021

News Flash

आजचं राशीभविष्य, रविवार, ३१ जानेवारी २०२१

सर्व बारा राशींचे भविष्य

 1. मेष : कामात द्विधावस्था आड आणू नका. मानसिक समाधान शोधण्याचा प्रयत्न करावा. मैत्रीचे संबंध दृढ होतील. कामाची योग्य पावती मिळेल. प्रवास जपून करावा.
 2. वृषभ : मुलांची खिलाडुवृत्ती वाढेल. चौकसपणे विचार करावा. मनातील इच्छा पूर्ण होईल. गैरसमजाला मनात थारा देवू नका. कामात स्त्रियांची मदत घेता येईल.
 3. मिथुन : एककल्ली विचार करू नका. घरातील वातावरण खेळकर राहील. वादाचे मुद्दे बाजूला सारावेत. घरातील कामात अधिक वेळ जाईल. स्वच्छतेवर अधिक भर द्याल.
 4. कर्क : जवळच्या सहलीला जाल. भावंडांचे उत्तम सहकार्य मिळेल. छंद जोपासता येईल. विविध विषयात रुची दाखवाल. मानसिक चांचल्या जाणवेल.
 5. सिंह : आवडीची कामे कराल. घरातील वातावरण आनंदी ठेवाल. बौद्धिक क्षमता दाखवता येईल. आपल्या आवडीबाबत आग्रही राहाल. मुलांच्या साहसाकडे लक्ष ठेवावे.
 6. कन्या : दिवस मजेत घालवाल. प्रवासात काळजी घ्यावी लागेल. कफ विकाराचा त्रास जाणवेल. तुमच्यातील प्रेमळपणा दिसून येईल. जुन्या गोष्टी उकरून काढू नका.
 7. तूळ : वैचारिक हटवादीपणा करू नका. टीकेला सामोरे जावे लागेल. भावंडांचा विरोध होण्याची शक्यता आहे. समोरील परिस्थिती लक्षात घ्यावी. संयम राखून बोलावे.
 8. वृश्चिक : तुमच्या खटपटी स्वभावाला खतपाणी मिळेल. श्रमाला मागेपुढे पाहू नका. गुरुकृपेचा लाभ घ्यावा. हातातील कामात यश येईल. घरासाठी मोठ्या वस्तू खरेदी कराल.
 9. धनू : शक्तीने कामे कराल. तुमच्यातील महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल. उत्तमरित्या परिस्थिती हाताळाल. सामाजिक कार्याची आवड जोपासाल. दिलदार वृत्तीने वागाल.
 10. मकर : उदार मतवादी राहाल. वागण्यात आत्मविश्वास दाखवून द्यावा. काही वेळेस कणखरपणा ठेवावा लागेल. स्वत:चा मान राखाल. विचारात सात्विकता दिसून येईल.
 11. कुंभ : कामे खिळून पडल्यासारखी वाटतील. सामाजिक गोष्टींची जाणीव ठेवावी. डोळ्यांची काळजी घ्यावी. पायाचे विकार बळावू शकतात. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी.
 12. मीन : कलागुण इतरांसमोर सादर करता येतील. तुमच्या मनातील आकांक्षा पूर्ण होतील. सामाजिक गोष्टीत पुढाकार घ्यावा. मुलांची प्रगती दिसून येईल. मान राखून कामे कराल.

  — ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2021 1:00 am

Web Title: daily astrology horoscope sunday 31 january 2021 aau 85
टॅग : Astrology
Next Stories
1 आजचं राशीभविष्य, शनिवार, ३० जानेवारी २०२१
2 आजचं राशीभविष्य, शुक्रवार, २९ जानेवारी २०२१
3 आजचं राशीभविष्य, गुरुवार, २८ जानेवारी २०२१
Just Now!
X