News Flash

आजचं राशीभविष्य, बुधवार, २१ एप्रिल २०२१

सर्व बारा राशींचे भविष्य

  1. मेष:-बोलण्यातून प्रभुत्व दाखवाल. कामात चांगले बदल घडून येतील. काहीसा मानसिक ताण जाणवेल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. घरगुती कामाचा ताण जाणवेल.
  2. वृषभ:-कलात्मक दृष्टीकोन ठेवाल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. झोपेची तक्रार जाणवेल. फसवणुकीपासून सावध रहा. लबाड लोकांपासून दूर राहावे.
  3. मिथुन:-स्त्री सौख्यात रमून जाल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. आवडीचे पदार्थ खायला मिळतील. अधिकारी व्यक्तींचा संपर्क होईल. संपर्कातील  लोकांचा स्नेह वाढेल.
  4. कर्क:-स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल. नवीन मित्र जोडाल. कामाची धांदल उडेल. घरातील स्त्रियांची मदत होईल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल.
  5. सिंह:-अती भावनाशील होऊ नका. तुमच्या कलेचे सादरीकरण करता येईल. उष्णतेचा त्रास जाणवेल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा लागेल. वरिष्ठांच्या कौतुकास पात्र व्हाल.
  6. कन्या:-परोपकारी दृष्टिकोन ठेवाल. गुरुकृपेचा लाभ होईल. दिवस काहीसा आरामात घालवाल. गोष्टी मनासारख्या घडून येतील. घरातील थोरांचे सहकार्य लाभेल.
  7. तूळ:-पत्नीशी क्षुल्लक कारणांवरून विसंवाद घडू शकतो. गुंतवणुकीचा लाभ घ्यावा. कामाचा वेग वाढेल. घरातील परिस्थितीचा योग्य अंदाज घ्यावा. वादाचे मुद्दे बाजूस सारावेत.
  8. वृश्चिक:-भावंडांशी मतभेद संभवतात. अनाठायी खर्च होऊ शकतो. पत्नीचा हट्ट पुरवावा लागेल. सहकार्‍याची भावना जपाल. जोडीदाराचे वर्चस्व राहील.
  9. धनू:-कौटुंबिक प्रश्न सामोपचाराने हाताळा. बोलताना शब्द जपून वापरावेत. गरज असेल तरच खर्च करावा. हाताखालील लोकांचे सहकार्य लाभेल. नसती काळजी करत बसू नका.
  10. मकर:-रागावर नियंत्रण ठेवा. डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. वैचारिक दृष्टिकोन बदलून पहावा. भागिदारीतून चांगला लाभ मिळेल. क्षुल्लक गोष्टींवरून चिडू नका.
  11. कुंभ:-सामुदायिक गोष्टींचे भान ठेवा. रखडलेले कामे पुढे सरकतील. घरात टापटीप ठेवाल. जवळचे मित्र भेटतील. शेतीच्या कामातून लाभ मिळेल.
  12. मीन:-कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. कामातून चांगला धनलाभ होईल. गप्पांमध्ये गुंग व्हाल. कष्टाचे योग्य चीज होईल. मित्रांशी मतभेद संभवतात.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2021 1:00 am

Web Title: daily astrology horoscope wednesday 21 april 2021 msr 87
Next Stories
1 आजचं राशीभविष्य, मंगळवार, २० एप्रिल २०२१
2 आजचं राशीभविष्य, सोमवार, १९ एप्रिल २०२१
3 आजचं राशीभविष्य, रविवार, १८ एप्रिल २०२१
Just Now!
X