News Flash

आजचं राशीभविष्य, बुधवार, १७ मार्च २०२१

सर्व बारा राशींचे भविष्य

  1. मेष:-तुमच्या प्रसन्न व्यक्तिमत्वाची छाप पडेल. सर्वजण तुमच्याकडे आकर्षिले जातील. आल्या-गेल्याचे तुम्ही उत्तम आदरातिथ्य कराल. दिवस आपल्या मनाप्रमाणे घालवाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.
  2. वृषभ:-मनाच्या चंचलतेला आवर घालावी. काही बाबींचा पुनर्विचार कराल. प्रवासात आरोग्याची काळजी घ्यावी. कमिशनच्या कामातून लाभ होईल. मोठ्या लोकांचा सहवास लाभेल.
  3. मिथुन:-मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. कामे सुरळीत पार पडतील. तुमच्या मनातील योजना व्यवस्थित आखल्या जातील. जोडीदाराचा विचार जाणून घ्यावा. मौल्यवान वस्तु खरेदी कराल.
  4. कर्क:-तुमच्या केलेचे योग्य मूल्यमापन केले जाईल. प्रशस्तीपत्रकास पात्र व्हाल. वरिष्ठांना खुश ठेवावे लागेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. नातवाईकांची मदत मिळेल.
  5. सिंह:-आधिभौतिक गोष्टींपासून दूर राहाल. वाचनाची आवड पूर्ण कराल. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल. जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवावा लागेल. वरिष्ठांशी मतभेद संभवतात.
  6. कन्या:-कमी श्रमात कामे होतील. रेस, जुगार यातून धनलाभ संभवतो. वारसाहक्काच्या कामातून फायदा होईल. अपचनाचा त्रास जाणवेल. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे.
  7. तूळ:-उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. जोडीदाराची उत्कृष्ट साथ मिळेल. एकमेकातील समजूतदारपणा वाढीस लागेल. दिखाऊपणाला भुलून जाऊ नये. बौद्धिक दृष्टीकोन ठेवावा.
  8. वृश्चिक:-केलेल्या कामाचे समाधान मिळेल. लोकोपवादापासून दूर राहावे. चुकीच्या मार्गाचा अवलंब टाळावा. पारदर्शीपणाने कामे करावी लागतील. व्यसनापासून दूर राहावे.
  9. धनू:-प्रवासात काही कारणाने अडचणी संभवतात. अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. काही बदल मनाविरुद्ध करावे लागू शकतात. घाई घाईने कोणालाही शब्द देऊ नका. पारंपरिक कामला गती येईल.
  10. मकर:-उतावीळपणे कोणतेही काम करू नका. कामाची धांदल उडेल. मनाची द्विधावस्था होईल. बौद्धिक चातुर्य दाखवाल. नवीन मित्र जोडावेत.
  11. कुंभ:-सर्वांशी गोडीने बोलाल. बौद्धिक डावपेच खेळाल. गोष्टी अधिक खोलात जाऊन जाणून घ्याल. योग्य तर्काचा वापर कराल. हसत-हसत आपली मते मांडाल.
  12. मीन:-कामाचा उरक वाढवावा लागेल. आवडी-निवडीबाबत अधिक दक्ष राहाल. आवडीचे पदार्थ बनवायला लावाल. काही वेळ स्वत:साठी देखील काढावा. लबाड लोकांपासून दूर रहा.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2021 12:46 am

Web Title: daily astrology horoscope wednesday17 march 2021 msr 87
Next Stories
1 आजचं राशीभविष्य, मंगळवार, १६ मार्च २०२१
2 आजचं राशीभविष्य, सोमवार, १५ मार्च २०२१
3 आजचं राशीभविष्य, रविवार, १४ मार्च २०२१
Just Now!
X