1. मेष:-
    काहीशी चिडचिड वाढेल. लहान मुलांमध्ये रमून जाल. नवीन मित्र जोडले जातील. सरकारी कामात वेळ जाईल. कामाच्या ठिकाणी सतर्क राहावे.
  2. वृषभ:-
    मनातील इच्छा पूर्ण होईल. मानसिक चांचल्य जाणवेल. घरापासून दूर जावे लागेल. मनातील गैरसमज काढून टाकावेत. कामात स्त्रियांची मदत मिळेल.
  3. मिथुन:-
    अपचनाचा त्रास जाणवेल. कामात चालढकल करू नका. हितशत्रूंवर लक्ष ठेवावे. शारीरिक उष्णता वाढेल. जनविरोधाकडे दुर्लक्ष करावे.
  4. कर्क:-
    कामाची धांदल उडेल. प्रलोभनाला बळी पडू शकता. वैवाहिक सौख्याकडे लक्ष द्यावे. मुलांची चिंता लागून राहील. पैज जिंकण्याची इच्छा बाळगाल.
  5. सिंह:-
    वाहन वेगावर नियंत्रण ठेवा. घरातील समस्यांकडे अधिक लक्ष द्या. मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष असू द्या. नव्या संधीची वाट पहावी. जुने आजार दुर्लक्षित करू नका.
  6. कन्या:-
    वैवाहिक सौख्य द्विगुणित होईल. घरातील गोष्टी जाणून घ्याव्यात. भावंडांशी मतभेद संभवतात. स्वमतावर आग्रही राहाल. संघर्षाला बळी पडू नये.
  7. तूळ:-
    आर्थिक बाजूचा नीट विचार करावा. जरूरी नसतांना उदार होऊ नका. स्वभावात लहरीपणा राहील. वादविवाद घालू नका. डोळ्याचे त्रास जाणवू शकतात.
  8. वृश्चिक:-
    कामात हटवादीपणा येईल. महत्त्वाकांक्षा वाढेल. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. उद्दीष्ट साध्य करण्याचा प्रयत्न कराल. इतरांचाही विचार करावा.
  9. धनू:-
    जबाबदारीने वागाल. मनात कसलीशी काळजी लागून राहील. प्रवासात काळजी घ्यावी. घरातील काही गोष्टी बदलाव्या लागतील. कौटुंबिक प्रश्न सोडवावेत.
  10. मकर:-
    खर्चाचे गणित जमवावे लागेल. कामात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. वेळेचे योग्य नियोजन करावे लागेल. जुन्या गोष्टी काढत बसू नका. कामाचा ताण राहील.
  11. कुंभ:-
    बदललेल्या गोष्टी नीट समजून घ्याव्यात. कामात चंचलता राहील. मित्रांचा रोष वाढू शकतो. झोपेची तक्रार जाणवेल. कौटुंबिक समाधान असेल.
  12. मीन:-
    दिवस मनासारखा घालवाल. दोन पावलं मागे येण्यास घाबरू नका. स्थावरच्या कामातून लाभ संभवतो. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. कामात प्रगती कराल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर