मेष

ॐ नरोत्तमाय नमः. कौटुंबीक समस्या सोडवू शकाल. नातेवाईकांशी, आप्तेष्ठांशी भेटीचे योग आहे. बांधकाम व्यावसायिकांना अनुकुल ग्रहमान आहे. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. प्रवास जपून करावा.
आजचा रंग –गडद निळा

वृषभ

ॐ गणाधिपतये नमः. वादविवाद टाळावेत. व्यावसायिक स्पर्धेचे योग आहे. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक नियोजन योग्य करु शकाल. भावंडांशी वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – पिवळा

मिथुन

ॐ देवेशाय नमः. आर्थिक नियोजन उत्तम करु शकाल. व्यावसायिक आणि नोकरदार मंडळींना उत्तम ग्रहमान आहे. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. उत्तम आर्थिक स्थितीचा योग आहे.
आजचा रंग –सोनेरी

कर्क

ॐ स्वसंवेदद्द्याय नमः. व्यवसायामध्ये प्रगती कारक ग्रहमान आहे ग्रहांच्या अनुकुलतेमध्ये व्यावसायिक स्थिरता प्राप्त होईल. प्रवासामध्ये दक्षता घ्यावी. सर्वांशी सुसंवाद राहील. वेळेचा योग्य वापर करावा. नियोजनबध्द दिवसाची आखणी करावी.
आजचा रंग –लाल

सिंह

ॐ विठ्ठलाय नमः. मोठे निर्णय सावधपणे घ्यावे. कुठल्याही कामात दिरंगाई नको. प्रवास जपून करावेत. आर्थिक व्यवहारामध्ये दक्षता बाळगावी.
आजचा रंग -गुलाबी

कन्या

ॐ प्रभंजनाय नमः. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. व्यवसायात अनुकूल वातावरण आहे. आर्थिक स्थिरता प्राप्त होईल. व्यावसायिक नियोजन उत्तम राहील. कमोडिटी, मार्केट, शेअर्समध्ये अनुकूल ग्रहमान राहील.
आजचा रंग –हिरवा

तुळ

ॐ तेजस्विने नमः. अधिकार संपन्नता येईल. उत्तम आर्थिक नियोजन करु शकाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. बांधकाम व्यावसायिक, स्थावर मालमत्तेशी निगडीत व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे.
आजचा रंग -फिक्कट पिवळा

वृश्चिक

ॐ चिदरत्नाय नमः. प्रगतीकारक ग्रहमान आहे. व्यवसाय, नोकरीमध्ये प्रतिष्ठा प्राप्त होईल. अनेक नवीन योजना राबविता येतील. वादविवाद टाळावेत. प्रवास जपून करावेत.
आजचा रंग –नारंगी

धनु

ॐ चिदप्रशांताय नमः. मोठे व्यावसायिक धाडस नको. प्रकृतीची काळजी घ्यावी. प्रवासामध्ये दक्षता घ्यावी. कमोडिटी, शेअर्स, मार्केट, व्यावसायिकांनी सावधपणे गुंतवणूक करावी. वादविवाद टाळावे.
आजचा रंग –पांढरा

मकर

ॐ अघनाशकाय नमः. व्यवसायात अनुकूल ग्रहमान राहील. अडचणींवर मात करु शकाल. नवीन संधी उपलब्ध होतील. पती-पत्नी मधील दुरावा कमी होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
आजचा रंग –मोरपंखी

कुंभ

ॐ सुदन्वाय नमः. आर्थिक नियोजन सावधपणे करावे. कुठल्याही स्वरुपाचे वादविवाद टाळावे. सहकार्‍यांशी, कामगारांशी सुसंवाद राखावा. मोठे आर्थिक नियोजन करताना सावधानता बाळगावी.
आजचा रंग- निळा

मीन

ॐ त्रिलोकेशाय नमः. महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल. धाडसी निर्णय घेऊ शकाल. नवीन योजनांचा पाठपुरावा करावा. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. उत्तम आर्थिक स्थितीचे योग आहे.
आजचा रंग – आकाशी

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu