मेष

संध्याकाळी महादेवाचे दर्शन घ्यावे, पशुपक्षांना अन्नदान करावे. आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. भविष्यातील मोठ्या योजनांची सुरूवात आज होऊ शकते. कुटुंबामध्ये सुखकारक वातावरण राहील. आनंदी वार्ता समजू शकते.
आजचा रंग –पिवळा

वृषभ

ॐ नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. भावंडांशी वादविवाद टाळावेत. जुने गैरसमज असल्यास आज ते मिटवण्याकडे कल ठेवावा. वरिष्ठांशी सलोखा राहील.
आजचा रंग – नारंगी

मिथुन

कुलदैवतांचे स्मरण करून दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. स्थावर मालमत्तेशी, जमिनीशी निगडीत व्यवहारांमध्ये यश संभवते. कलाकार, विचारवंत, साहित्यिकांसाठी उत्तम दिवस आहे. धन स्थिती उत्तम राहील. छोट्या प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग –हिरवा

कर्क

ॐ नमः शिवाय या मंत्राचा जप सुरू ठेवावा. आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. आजचे ग्रहमान सर्व कामांच्या पाठपुराव्यासाठी योग्य आहे. अडकलेली कर्ज प्रकरणे, जुनी आर्थिक येणी वसूल करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे.
आजचा रंग –पोपटी

सिंह

ॐ सोमाय नमः जप करून दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. आर्थिक उलाढाल जपून करावी. वरिष्ठांची मर्जी राखावी. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग -गुलाबी

कन्या

ॐ नमः शिवाय जप दिवसभर मनातल्या मनात सुरू ठेवावा. आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. सर्व प्रकारच्या लाभांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. आनंदी दिवस जाईल, सहलीचे योग आहेत. नवीन कामांचा पाठपुरावा करावा. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. लोखंडाशी निगडीत व्यवसाय करणार्‍यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे.
आजचा रंग –लाल

तुळ

महादेवाच्या मंदिरात अभिषेक करावा. आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. व्यवसाय, नोकरीमध्ये उत्तम प्रतिसाद मिळेल. जबाबदार्‍या पार पाडाल. सरकारी अधिकारी वर्गासाठी आजचा दिवस उत्तम आहे. मोठे निर्णय घेऊ शकाल. नोकरदारांनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत.
आजचा रंग -पिवळा

वृश्चिक

ॐ नमः शिवाय मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. दूरचे प्रवास संभवतात. परदेशाशी निगडीत नोकरी, व्यापारांमध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतीत. संध्याकाळ नंतरचा वेळ आनंदात जाईल.
आजचा रंग –आकाशी

धनु

ॐ नमः शिवाय मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. मोठे महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत. वाहने जपून चालवावीत. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची चिंता सतावेल. व्यवसायात मोठे धाडस नको.
आजचा रंग –पांढरा

मकर

महादेवाच्या मंदिरात धान्य आणि पांढरी फुले अर्पण करावी. आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. कौटुंबिक सौख्य जाणवेल. नवविवाहितांसाठी चांगला दिवस आहे. व्यवसायांशी निगडीत एखादी चांगली वार्ता समजेल. व्यवसाय वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करावे. आर्थिक नियोजन उत्तम राहील.
आजचा रंग –नारंगी

कुंभ

ॐ नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप सुरू ठेवावा. आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक व्यवहार जपून हाताळावेत. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये, प्रवासामध्ये काळजी घ्यावी. आर्थिक विवंचना राहतील. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा.
आजचा रंग- लाल

मीन

महादेव मंदिरामध्ये पांढरी फुले अर्पण करावी. आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत आहे. मुलांशी निगडीत किंवा घरांतील धाकट्या भावंडांशी निगडीत चांगली वार्ता समजेल, त्यांचे प्रश्न सोडवू शकाल. अडचणींमध्ये ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यवसायांमध्ये नवीन संधी उपलब्ध होतील.
आजचा रंग – निळा

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu