05 August 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, शनिवार, १९ ऑक्टोबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  मनाची चलबिचलता जाणवेल. एकाच वेळी अनेक कामे अंगावर येऊन पडू शकतात. वेळेचे योग्य नियोजन करावे. जवळचा प्रवास घडेल. हातातील कामावर अधिक लक्ष द्यावे.
 • वृषभ:-
  उत्तम कौटुंबिक सौख्य मिळेल. दिवस छान मजेत घालवाल. मनाची काहीशी द्विधावस्था जाणवेल. घरात धार्मिक कार्यक्रम होतील. आवड पूर्ण करण्यावर भर द्याल.
 • मिथुन:-
  एकाचवेळी अनेक कामात हात घालू नका. चित्त एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. योग्य वेळ साधण्याचा प्रयत्न करावा. घरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा.
 • कर्क:-
  भावनेच्या भरात कोणतीही गोष्ट करायला जावू नका. फसवणुकीपासून सावध राहावे. सामाजीक जाणीव ठेवाल. अकारण चिंता करत बसू नका. चोरांपासून सावधगिरी बाळगावी.
 • सिंह:-
  कामातून अपेक्षित लाभ मिळेल. तुमच्या मनातील आकांक्षा पूर्ण होतील. जवळचे मित्र भेटतील. घराचे सुशोभीकरण कराल. उपासनेला अधिक बळ मिळेल.
 • कन्या:-
  कामाचा उरक वाढेल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. घेतलेल्या कामाचे चीज होईल. नवीन कामाचा आनंद घ्याल. कामातून समाधान लाभेल.
 • तूळ:-
  व्यावसायिक प्रगती साधता येईल. तुमच्या कामाच्या पद्धतीचे कौतुक होईल. तुमचा मान वधारेल. परोपकाराची जाणीव ठेवून वागाल. दिवस आनंदात जाईल.
 • वृश्चिक:-
  किरकोळ मानसिक त्रासावर शांततेने मात कराल. उगाच चिडचिड करणे टाळावे. अचानक धनलाभ संभवतो. कफविकारांचा त्रास जाणवू शकतो. काही कामे वेळ घालवतील.
 • धनु:-
  जोडीदाराचा समजूतदारपणा मनात भरेल. योग्य संधीची वाट पहावी. कामात काही किरकोळ बदल करून पाहावेत. तुमचा जनसंपर्क वाढेल. चारचौघात कौतुक केले जाईल.
 • मकर:-
  कामाची धांदल उडेल. कलेतून कमाईला चांगली संधी मिळेल. जोडीदाराविषयी गैरसमज करून घेवू नका. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. आपले अधिकार वापरावेत.
 • कुंभ:-
  मुलांकडून आनंद वार्ता मिळतील. बौद्धिक खेळ खेळाल. आवडते छंद जोपासावेत. करमणुकीवर भर द्यावा. एककल्ली विचार करू नयेत.
 • मीन:-
  घरगुती कामे वाढतील. घरातील वातावरण खेळकर असेल. जवळचे मित्र भेटतील. कामात चिकाटी ठेवावी. वादविवादात पडू नये.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2019 12:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi saturday 19 october 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, १८ ऑक्टोबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, गुरुवार, १७ ऑक्टोबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, बुधवार, १६ ऑक्टोबर २०१९
Just Now!
X