04 December 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, शनिवार, २४ ऑक्टोबर २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

मेष:-मानसिक विकासासाठी बळ एकजूट करा. मनातील संमिश्र विचार काढून टाका. अधिकारी वर्गाशी मतभेद संभवतात. कौटुंबिक सदस्यांची साथ मिळेल. दिवसभर कामाची गडबड राहील.

वृषभ:-घरातील कामासाठी पैसे खर्च होतील. दिवस आव्हानात्मक असेल. कोणावरही चटकन विश्वास ठेऊ नका. महागड्या वस्तु सांभाळून ठेवा. सावधगिरीने परिस्थिती हाताळा.

मिथुन:-कुटुंबात मान वाढेल. तुमच्या कल्पकतेचे कौतुक केले जाईल. प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करा. निश्चयाने कामे तडीस न्यावीत. मोसमी आजार त्रस्त करू शकतात.

कर्क:-आजारांकडे दुर्लक्ष करू नका. लहान गोष्टी सुद्धा अंगावर काढू नका. कोणतीही जोखीम पत्करताना सावध रहा. आर्थिक व्यवहारासंबंधी निर्णय विचारपूर्वक घ्या. जोडीदाराशी विचार विनिमय करा.

सिंह:-दिवस चांगला जाईल. मेहनतीचे चीज होईल. उदार मनाने क्षमाशील राहाल. जोडीदाराची मदत घ्याल. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल.

कन्या:-आळसात दिवस घालवू नका. नातेवाईक भेटतील. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करणे हिताचे ठरेल. जोडीदाराशी जुळवून घ्यावे.

तूळ:-आपले मत सर्वांसमोर मांडाल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. नवीन योजनेवर काम कराल. घरातील जबाबदारी अंगावर पडेल. आवडीसाठी खर्च कराल.

वृश्चिक:-नातेवाईकांशी जुळवून घ्या. भावनात्मक प्रसंग घडू शकतात. विचारपूर्वक निर्णय घ्या. गोड बोलून कामे करून घ्या. नवीन ओळख होईल.

धनू:-आपले स्वतंत्र व्यक्तिमत्व दाखवून द्या. त्यातून लाभच होईल. नातेवाईक आनंदवार्ता देतील. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. सकारात्मकता वाढीस लागेल.

मकर:-भावंडांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. दिवस मर्जीप्रमाणे घालवाल. मनातील नकारात्मकता काढून टाका. धार्मिक गोष्टीत सहभागी व्हा. कमिशनचा लाभ मिळेल.

कुंभ:-मनातील निराशा झटकून टाका. ध्यानधारणेत मन रमवा. तणावाखाली नवीन गोष्ट करू नका. कुटुंबातील सदस्यांची साथ मिळेल. बोलताना शब्दांचे महत्त्व लक्षात घ्या.

मीन:-नवीन संधी चालून येतील. योग्य वेळी पाऊले उचला. परंतु सारासार विचारांची जोड घ्या. क्षुल्लक वादापासून दूर रहा. दूरच्या मित्रांशी संपर्क साधाल.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2020 12:16 am

Web Title: daily horoscope astrology in marathi saturday 24 october 2020 scj 81
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२०
2 आजचे राशीभविष्य, गुरूवार, २२ ऑक्टोबर २०२०
3 आजचे राशीभविष्य, बुधवार, २१ ऑक्टोबर २०२०
Just Now!
X