मेष

कालभैरव अष्टकाचा पाठ करावा, गुरु वंदन करुन दिवसाची सुरुवात करावी. आर्थिक नियोजन उत्तम करु शकाल. व्यावसायिकांना आणि नोकरदार मंडळींना उत्तम ग्रहमान आहे. महत्त्वकांशी योजनांचा पाठपुरावा करावा. आर्थिक नियोजन उत्तम करु शकाल. उत्तम आर्थिक स्थितीचे योग आहेत.
आजचा रंग –निळा

वृषभ

कुलस्वामिनी आणि कुलदैवताचे दर्शन करावे. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. ग्रहांच्या अनुकूलतेमध्ये व्यावसायिक स्थिरता प्राप्त होईल. प्रवासामध्ये दक्षता घ्यावी. सर्वांशी सुसंवाद होईल. वेळेचा योग्य वापर करावा. नियोजनबद्ध दिवसाची आखणी करावी.
आजचा रंग – पिवळा

मिथुन

महादेव मंदिरामध्ये एक मुठ तांदुळ अर्पण करावे आणि दर्शन घ्यावे. मोठे निर्णय सावधपणे घ्यावे. कुठल्याही कामात दिरंगाई नको. प्रवास जपून करावेत. आर्थिक व्यवहारामध्ये दक्षता बाळगावी.
आजचा रंग –सोनेरी

कर्क

महादेवाचे आणि कालभैरवांचे दर्शन घ्यावे. अधिकार संपन्नता येईल. उत्तम आर्थिक नियोजन करु शकाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. गुरु बदलाचा लाभ होईल. बांधकाम व्यावसायिक, स्थावर मालमत्तेशी निगडीत व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे.
आजचा रंग –लाल

सिंह

ओम नम: शिवाय या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मेष राशीमध्ये असेल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. भाग्यकारक घटनांचा दिवस आहे. वाहन सौख्य लाभेल. सर्वांचे सहकार्य लाभेल. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे.
आजचा रंग -गुलाबी

कन्या

कुलदैवतेचे स्मरण करावे. प्रगतीकारक ग्रहमान आहे. व्यवसाय, नोकरीमध्ये प्रतिष्ठा प्राप्त होईल. अनेक नवीन योजना राबवता येतील. वादविवाद टाळावेत. प्रवास जपून करावेत. दूरच्या प्रवासाचे योग आहेत.
आजचा रंग –हिरवा

तुळ

ग्रामदैवतेची पुजा करावी. मोठे व्यावसायिक धाडस नको. प्रकृतीची काळजी घ्यावी. प्रवासामध्ये दक्षता घ्यावी. कमोडटी, शेअर्स, मार्केट व्यावसायिकांनी सावधपणे गुंतवणूक करावी. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग -फिक्कट हिरवा

वृश्चिक

गणपती मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावे. अडचणींवर मात करु शकाल. नवीन संधी पलब्ध होतील. पती, पत्नींमधील दुरावा कमी होईल. कौटुबिक सौख्य लाभेल.
आजचा रंग –नारंगी

धनु

आज कुलदैवतेचे मुळ स्थानावर जाऊन दर्शन घ्यावे. आर्थिक नियोजन सावधपणे करावेत. कुठल्याही स्वरुपाचे वादविवाद टाळावेत. सहकाऱ्यांशी, कामगारांशी सुसंवाद राखावा. मोठे आर्थिक नियोजन करताना सावधानता बाळगावी.
आजचा रंग –पांढरा

मकर

कुलदैवतेचे स्मरण करावे, दर्शन घ्यावे. महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल. धाडसी निर्णय घेऊ शकाल. नवीन योजनांचा पाठपुरावा करावा. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. उत्तम आर्थिक स्थितीचे योग आहेत.
आजचा रंग –मोरपंखी

कुंभ

ओम श्री आदित्याय नमः या मंत्राचा ११ वेळा जप करावा. कौटुंबिक समस्या सोडवू शकाल. नातेवाईकांशी, आप्तेष्ठांशी भेटीचे योग आहेत. बांधकाम व्यावसयिकांना अनुकूल ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. प्रवास जपून करावेत.
आजचा रंग- निळा

मीन

आज कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे आणि स्मरण करावे. वादविवाद टाळावेत. व्यावसायिक स्पर्धेचे योग आहेत. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक नियोजन योग्य करु शकाल. भावंडांशी वादविवाद टाळावेत.

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu