13th Feb Maghi Ganesh Jayanti Panchang Horoscope: आज माघी गणेश जयंतीला कित्येक वर्षांनी अंगारक योग जुळून आला आहे. या दिवशी गणपती बाप्पा नेमके कोणत्या राशीला पावणार हे आपण पाहूया. वैदिक पंचांगानुसार मेष ते मीन राशीला ग्रहमानानुसार कसे फळ प्राप्त होईल याचा आढावा.

मेष:-जलद गतीने कामे कराल. सतत आपले अस्तित्व दाखवाल. सरकारी कामात यश येईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. तुमची समाजप्रियता वाढेल.

वृषभ:-तुमचे अंगीभूत गुण दिसून येतील. चांगल्या बोलण्याने व्यावसायिक मान मिळवाल. सजावटीच्या वस्तु खरेदी कराल. चैनीच्या वस्तु गोळा कराल. लिखाणाला प्रसिद्धी मिळेल.

मिथुन:-मनाची विशालता दाखवाल. वाचनाची आवड पूर्ण कराल. कलेला पोषक वातावरण मिळेल. सहृदयतेने वागाल. अचानक धनलाभ संभवतो.

कर्क:-जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. मुलांच्या प्रशिक्षणाकडे लक्ष द्यावे. खर्चाच्या बाबतीत अविचाराने निर्णय घेऊ नका. रेस, सट्टा यांची आवड पूर्ण कराल. कामातील विलंब टाळावा.

सिंह:-वैवाहिक सौख्यात भर पडेल. घरातील शांतता महत्त्वाची आहे. स्थावरची कामे पूर्णत्त्वाला जातील. कामाचे समाधान लाभेल. भावंडांची काळजी लागून राहील.

कन्या:-कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल. आपल्याच मतावर आग्रही राहाल. नातेवाईकांची मदत घेता येईल. भावनेतून मनाचे शुद्ध रूप दर्शवावे. खाण्या-पिण्याच्या सवयी लक्षात घ्याव्यात.

तूळ:-सर्जनशीलतेने वागाल. आत्मिक समाधान मिळवण्याचा प्रयत्न कराल. कलेला पोषक वातावरण मिळेल. मित्रपरिवार जमवाल. गप्पा-गोष्टी करण्यात वेळ घालवाल.

वृश्चिक:-घरासाठी सजावटीच्या वस्तु खरेदी कराल. आपल्या प्रांजल स्वभावाची चुणूक दाखवाल. बागकामाची हौस भागवाल. महिलांना उत्तम गृहिणी पदाचा मान मिळेल. घरात समाधान निर्माण कराल.

धनू:-आनंदीवृत्तीने वागाल. वाचनाची आवड पूर्ण करता येईल. इतरांचे भरभरून कौतुक कराल. आध्यात्मिक बळ वाढेल. यशाची वाट मोकळी होईल.

मकर:-बोलण्याने इतरांवर चांगली छाप पाडाल. क्षुल्लक कमतरता भरून निघेल. गायन कलेला उठाव मिळेल. मौल्यवान वस्तु खरेदी कराल. आवडते खाद्य पदार्थ खाल.

कुंभ:-तुमचे व्यक्तिमत्व खुलून येईल. सर्वांशी मधुर वाणीने बोलाल. नवीन गोष्टींकडे ओढ वाढेल. प्रत्येक गोष्टीचा मनापासून आनंद घ्याल. उत्तम मैत्री लाभेल.

हे ही वाचा<< १०० वर्षांनी तिलकुंद चतुर्थीला चतुर्ग्रही योग; आजपासून ‘या’ राशींना अचानक लाभेल गणेश व लक्ष्मीकृपा, व्हाल धनाढ्य

मीन:-यशाची नवीन पायरी गाठता येईल. मोठ्या लोकांच्या ओळखीतून कामे करावीत. गप्पिष्ट लोकांच्यात वावराल. मुलांकडून आनंद वार्ता मिळतील. मनातील इच्छा पूर्ण होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर