14th February Marathi Horoscope Valentine Day Special: १४ फेब्रुवारी हा प्रेमाचा दिवस म्हणून ओळखला जातो. विशेष म्हणजे आज पंचांगानुसार वसंत पंचमीची तिथी जुळून येत आहे. ज्योतिषी विद्याधर करंदीकर यांच्याकडून आजचं दिवसाचे मेष ते मीन राशीचे भविष्य जाणून घेऊया..

मेष:-हरहुन्नरीपणा दाखवून द्यावा. लेखकांना चांगली प्रतिभा लाभेल. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल. मनातील सुप्त इच्छा पूर्ण होतील. परिस्थितीचा योग्य अंदाज घ्यावा.

वृषभ:-बोलण्यातून इतरांवर चांगली छाप पाडाल. प्रवास मजेत घडेल. वाचनाची आवड भागवाल. वडीलांचा विरोध होऊ शकतो. आपल्या तरल बुद्धीचा वापर करावा.

मिथुन:-जोडीदाराचे कौतुक करावे. विचारांना योग्य चालना द्यावी. भावंडांना मदत कराल. अचानक धनलाभ संभवतो. मुलांचे प्रश्न सावधगिरीने हाताळा.

कर्क:-जोडीदाराची प्रगती अनुभवाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. जवळचा प्रवास घडेल. सहकुटुंब फिरण्याचा आनंद मिळेल. मनातील गैरसमज बाजूला सारावेत.

सिंह:-इतरांचा विश्वास संपादन करावा. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. नातेवाईकांना मदत करावी लागेल. कफाचे त्रास संभवतात. उगाचच भांडणात अडकू नका.

कन्या:-लेखकांच्या कामाला वेग येईल. तुमच्यातील धाडस वाढेल. कौटुंबिक समाधान लाभेल. खर्च देखील काहीसा वाढेल. बोलता-बोलता शब्द देवू नका.

तूळ:-रागावर नियंत्रण ठेवावे. फार तिखट पदार्थ खाऊ नयेत. वस्तूंची आवश्यकता लक्षात घेऊन खर्च करावा. आपले मत परखडपणे मांडाल. नवीन मित्र जोडाल.

वृश्चिक:-तुमच्यातील उतावीळपणा वाढेल. सारासार विचाराला प्राधान्य द्यावे. ज्ञान गोळा कराल. आपल्याकडची माहिती इतरांना द्याल. बोलतांना तोल जाऊ देवू नका.

धनू:-गोड शब्दांनी सर्वांना जिंकाल. एखादे वाद्य शिकण्याची इच्छा होईल. कमिशनमधून चांगला लाभ होईल. सामाजिक जाणीव ठेवून वागावे. सामुदायिक गोष्टीत फार लक्ष घालू नका.

मकर:-आपल्या बुद्धीचा सदुपयोग करावा. कामातील दिरंगाई टाळण्याचा प्रयत्न करावा. राजकारणी व्यक्तींना लाभ होईल. आपले मत चांगल्याप्रकारे मांडाल. बुद्धि चातुर्य दाखवावे.

कुंभ:-महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवावीत. मानसिक चंचलता जाणवेल. बढतीचे योग येतील. कामाच्या स्वरुपात बदल होईल. थोडे अधिक कष्ट पडण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा<< ३० दिवस शनीच्या राशीत सूर्य चमकणार, ‘या’ ३ राशी होतील मालामाल, तर ‘दोन’ राशींनी ओळखा धोक्याची घंटा

मीन:-मनातील इच्छा पूर्णत्त्वाला जातील. मित्रांची उत्तम साथ राहील. आभ्यासू लोकांच्यात वावराल. व्यापारी वर्गाला चांगला आर्थिक लाभ होईल. तुमच्या ओळखी वाढतील.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर