15th April Panchang & Rashi Bhavishya: आज १५ एप्रिलला चैत्र शुक्ल पक्षातील सप्तमी आहे. तसेच दिनविशेष पाहिल्यास आज कुलस्वामिनी श्री एकवीरा देवीच्या कार्ला गडावर पालखी सोहळा सुद्धा आहे. आजच्या दिवशी देवी कोणत्या राशीला आशीर्वाद देणार आहे चला पाहू. वाचा मेष ते मीन राशीचे आजचे भविष्य.

१५ एप्रिल पंचांग व राशीभविष्य –

why Akshay Kumar wakes up 'two and a half hours' before his wife and kids
“…म्हणून मी पत्नी आणि मुलांच्या ‘अडीच तास’ आधी उठतो”, अक्षय कुमारने सांगितले त्याच्या या खास सवयी मागचे कारण, पाहा
case of the missing keys Puri Jagannath temple Naveen Patnaik Odisha
‘एवढ्या’ दागिन्यांची सरकारच करतंय चोरी; पंतप्रधानांचा कुणावर आरोप?
Nitin Gadkari Kundali Predictions
मोदींच्या पंच्याहत्तरीच्या चर्चेत ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी; २०२६ नंतर गडकरींच्या कुंडलीत राजकीय बहुमानाचा योग
Menstrual Cleansing Day 2024 what if Menstrual cycle does not continue
पाळी सुरूच झाली नाही तर?
200 Years Later Shani Jayanti 2024 Nakshtra Gochar
चौफेर धनवर्षाव होणार! २०० वर्षांनी शनी जयंतीला ‘हा’ दुर्मिळ योगायोग; तीन राशींच्या कुंडलीत ‘या’ रूपात वसेल लक्ष्मी
surya gochar 2024 after 30 days the fate of zodiac signs will change due to movement of sun transit surya rashifal there will be bumper benefits
३० दिवसांनंतर ‘या’ तीन राशींच्या नशिबाला मिळणार कलाटणी! सूर्याच्या राशी बदलाने मिळू शकेल बक्कळ पैसा अन् संपत्ती
CRIME NEWS
खळबळजनक! आईने पोटच्या मुलाला फेकले मगरींच्या तलावात; नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण घटनाक्रम
marathi actress Kranti Redkar Wankhede tells the story behind the nicknames of the twin girls
Video: क्रांती रेडकरने जुळ्या मुलींच्या टोपण नावामागची सांगितली गोष्ट; एकीच्या नावाचा संबंध आहे झाशीच्या राणीशी तर दुसरीचा…

मेष:- कौटुंबिक प्रश्न सुटतील. तुमचे व्यक्तिमत्व बहरेल. नोकरदार वर्गाला चांगला नफा मिळेल. आर्थिक व्यवहार सावधगिरीने करावेत. तुमच्यातील उद्योगशीलता वाढेल.

वृषभ:- घरात महिलांचे वर्चस्व वाढेल. अवाजवी कामे अंगावर घेऊ नयेत. मेहनतीला मागेपुढे पाहू नका. उधार उसनवारीचे व्यवहार करू नयेत. खर्च आटोक्यात ठेवावा.

मिथुन:- बिनधास्तपणे वागणे ठेवाल. पत्नीच्या प्रेमळ सौख्यात भर पडेल. तरुण वर्गाशी संपर्क वाढेल. नियम बाह्य कामे करू नका. योग्य मार्गदर्शनाचा लाभ घ्या.

कर्क:- उत्तम वाहन सौख्य लाभेल. घरगुती कामे वेळेत पार पडतील. मनाजोगी खरेदी करता येईल. मित्र परिवारात वाढ होईल. मौल्यवान वस्तु लाभतील.

सिंह:- कामानिमित्त प्रवास कराल. बोलण्यातून इतरांवर छाप पाडाल. दान धर्माचे पुण्य पदरी पडेल. स्पर्धकांवर मात करता येईल. हाताखालील लोकांवर लक्ष ठेवावे.

कन्या:- तब्येतीची काळजी घ्यावी. पित्त प्रकृतीत वाढ संभवते. मुलांचे वागणे मनाविरुद्ध वाटू शकते. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. आध्यात्मिक अनुभूतीचा लाभ मिळेल.

तूळ:- व्यावसायिक प्रवास करावा लागेल. स्वत:चेच खरे करण्याचा प्रयत्न कराल. मनात उगीचच हुरहूर वाटेल. मानपमानाचे प्रसंग येऊ शकतात. जोडीदाराशी विचार विनिमय करावा.

वृश्चिक:- हित शत्रूंचा त्रास संभवतो. कामातील उत्साह वाढेल. भावंडांचे प्रश्न सामोरे येतील. स्वभावात काहीसा हटवादीपणा येईल. नवीन आव्हान पेलाल.

धनू:- कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा. व्यापारी वर्गाला चांगला धनलाभ होईल. जोडीदाराशी किरकोळ मतभेद संभवतात. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. नातेवाईकांना मदत करावी लागेल.

मकर:- काही वेळ शांत राहणे उत्तम. फार उतावीळपणा करू नका. उष्णतेचे विकार संभवतात. कामातील उत्साह वाढीस लागेल. स्वत:च्या हिंमतीवर कामे पूर्ण कराल.

कुंभ:- सामुदायिक वादात अडकू नका. काही कामे खिळून पडल्यासारखी वाटतील. प्रवासात काळजी घ्यावी. गैरसमजुतीतून त्रास संभवतो. हातापायांना किरकोळ इजा संभवते.

मीन:- कौटुंबिक जबाबदारी वाढेल. जवळचा प्रवास मजेत पार पडेल. मित्रांची नाराजी दूर करावी. तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल. व्यवहारी दृष्टीकोन ठेवाल.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर