16th July Panchang & Marathi Rashi Bhavishya: १६ जुलै २०२४ ला आषाढ शुक्ल पक्षातील दशमी तिथी आहे. मंगळवारी रात्री ८ वाजून ३४ मिनिटांपर्यंत दशमी तिथी कायम असणार आहे व त्यानंतर एकादशीला सुरुवात होईल. १६ जुलैचा पूर्ण दिवस व पूर्ण रात्र पार करून बुधवारी शकलो ७ वाजून ४ मिनिटांपर्यंत शुभ योग असणार आहे. मंगळवारी रात्री २ वाजून १४ मिनिटांपर्यंत विशाखा नक्षत्र जागृत असणार आहे. याशिवाय १६ जुलैच्या शकलो ११ वाजून १९ मिनिटांनी सूर्याचा कर्क राशीत प्रवेश होणार आहे. आजच्या दिवशी मेष ते मीन राशीच्या नशिबात सूर्याचे तेज कसे असेल हे पाहूया..

१६ जुलै पंचांग व राशी भविष्य

मेष:-आत्मविश्वास वाढीस लागेल. ग्रहांची अनुकूलता लाभेल. मित्र परिवाराचे सहकार्य लाभेल. तांत्रिक ज्ञान वाढीस लागेल. शेअर्स मधून लाभ संभवतो.

वृषभ:-नियोजित व्यवहारात काटेकोरपणा ठेवावा. तरुणांनी आळशीपणा करू नये. कौटुंबिक चर्चेला महत्त्व द्यावे. सामाजिक भान ठेवणे हिताचे. ज्येष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे.

मिथुन:-महत्त्वाची कामे आधी पार पाडावीत. मनाची उदासीनता दूर सारावी. जोखीम घेताना सावध रहा. योग्य तर्क बांधावा लागेल. काही गोष्टींचे चिंतन करून पाहावे.

कर्क:-घरगुती वातावरणाकडे लक्ष ठेवा. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नकोच. आपल्या मताबद्दल आग्रही राहाल. मुलांचा खोडकरपणा वाढेल. रेस जुगाराची आवड जोपासाल.

सिंह:-मनातील नकारात्मक विचार वेळीच रोखा. तरुणांना करियर विषयाची चिंता सतावेल. बौद्धिक ताण घेऊ नका. कामात तत्परता दाखवावी. बौद्धिक ताणामुळे थकवा जाणवेल.

कन्या:-जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. वेळोवेळी वैद्यकीय सल्ला घ्यावा. झोपेची तक्रार जाणवेल. खर्चाला वाटा फुटू शकतात. मौल्यवान वस्तु काळजीपूर्वक ठेवाव्यात.

तूळ:-कौटुंबिक गोष्टींचा प्राधान्याने विचार करा. तरुण वर्गाचे मत जाणून घ्या. काहीतरी नवीन शिकायला मिळेल. दृष्टीकोनात बदल करून पहा. जोडीदाराशी जुळवून घ्यावे.

वृश्चिक:-आपल्या मनाप्रमाणे वागणे ठेवाल. हेतु समजून प्रतिक्रिया द्यावी. व्यसनाच्या आहारी जाऊ नये. सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवा. हाताखालील लोकांवर फार अवलंबून राहू नका.

धनू:-जोडीदाराचे सौख्य वाढेल. गरजेनुसार काही बदल करून पहा. मनातील नसती चिंता बाजूस सारा. जबाबदारी स्वीकारण्याची तयारी ठेवा. जुनी कामे सामोरी येतील.

मकर:-मनातील इच्छा पूर्ण होईल. घरातील वातावरण तप्त राहू शकते. स्थावर व्यवहारातून लाभ होईल. योग्य संधीची वाट पहावी लागेल. मेहनतीला पर्याय नाही हे लक्षात ठेवा.

कुंभ:-मैत्रीचे संबंध वृद्धिंगत होतील. वैवाहिक जीवनात आनंद वाटेल. सहकारी अपेक्षित मदत करतील. मेहनतीचे फळ मिळाल्याने समाधान वाटेल. उत्साहाच्या भरात कामाकडे दुर्लक्ष करू नका.

हे ही वाचा<< श्रीकृष्ण जन्माष्टमी २०२४ पासून ‘या’ तीन राशी दुःखातुन होतील मोकळ्या; लक्ष्मी ‘या’ रूपात देऊ शकते दही साखरेचा प्रसाद

मीन:-तोंडात साखर ठेवून बोलावे. आपल्याच माणसांवर संशय घेऊ नका. काटकसरीवर भर द्यावा. जवळचे मित्र भेटतील. आहारावर नियंत्रण ठेवा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर