2 November Horoscope: वैदिक ज्योतिषानुसार शुक्र हा धन, संपत्ती, वैभव आणि ऐश्वर्याचा कारक ग्रह मानला जातो. शुक्र वेळोवेळी आपली रास बदलत असतो. शुक्राच्या राशी बदलाचा परिणाम मेष ते मीन या सर्व राशींवर दिसून येतो.

२ नोव्हेंबर २०२५, रविवार या दिवशी शुक्र तूळ राशीत प्रवेश करेल आणि २५ नोव्हेंबरपर्यंत त्या राशीत राहील. या काळात शुक्राच्या तूळ राशीतील गोचरामुळे सर्व १२ राशींवर परिणाम होईल. काही राशींना या गोचराचा विशेष लाभ मिळू शकतो.

ज्योतिष गणनेनुसार, या राशींना नोकरीत आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे तसेच आर्थिक स्थितीही सुधारेल. चला तर मग जाणून घेऊया, या शुक्र गोचरामुळे कोणत्या राशींना फायदा होईल आणि त्याचे काय परिणाम दिसतील.

मेष राशी (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी शुक्राचा गोचर शुभ ठरणार आहे. या काळात केलेल्या प्रवासातून फायदा होईल. नोकरीत चांगले प्रस्ताव किंवा ऑफर मिळू शकतात. उत्पन्नाचे नवे मार्ग तयार होतील, त्यामुळे आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. तुम्ही पैशाची बचत करण्यात यशस्वी ठराल. व्यापाऱ्यांसाठीही हा काळ फायदेशीर राहील.

वृषभ राशी (Tuaurs Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी शुक्राचा राशी बदल चांगला ठरणार आहे. या काळात तुम्हाला ऑफिसमध्ये नवीन जबाबदाऱ्या किंवा भूमिका मिळू शकतात. जमीन, घर किंवा वाहन खरेदीचे योग आहेत. धन आणि संपत्तीमध्ये वाढ होईल. कमाईचे नवे मार्ग तयार होतील. गुंतवणुकीसाठी चांगल्या संधी मिळू शकतात.

सिंह राशी (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी शुक्राचा तूळ राशीतील गोचर अनुकूल ठरणार आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. वैवाहिक जीवन आधीपेक्षा चांगले होईल. पैशाचे नवे स्रोत मिळतील. भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. व्यापाऱ्यांना व्यवसाय वाढवण्याच्या चांगल्या संधी मिळतील.

कन्या राशी (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी शुक्राचा राशी बदल चांगला ठरणार आहे. या काळात आर्थिक स्थितीत सुधारणा दिसेल. एखादी आनंदाची बातमी मिळेल. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ चांगला राहील. तुमची वाणी प्रभावशाली राहील आणि लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. मान-सन्मान मिळण्याची शक्यता आहे.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)