Horoscope Today In Marathi, 20 June 2025 In Marathi : २० जून २०२५ रोजी जेष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे. नवमी तिथी सकाळी ९ वाजून ५० मिनिटांपर्यंत राहील. रात्री ११ वाजून ४७ मिनिटांपर्यंत शोभन योग जुळून येईल. रात्री ९ पर्यंत ४५ मिनिटांपर्यंत रेवती नक्षत्र जागृत असेल. राहू काळ १०:३० वाजता सुरु होईल ते १२ वाजेपर्यंत असणार आहे. तर शुक्रवार तुमच्या राशीसाठी काय घेऊन येणार जाणून घेऊया…

२० जून २०२५ आजचे राशिभविष्य (Today Horoscope In Marathi, 20 June 2025)

आजचे मेष राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)

कुटुंबाचे उत्तम सहकार्य मिळेल. व्यवसायात चांगला नफा मिळू शकेल. नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून पाहावा. तुम्ही घेत असलेल्या प्रयत्नात यश येईल. कौटुंबिक सौख्यात वृद्धी होईल.

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)

दिवस मनाप्रमाणे व्यतीत कराल. कौटुंबिक गोष्टींच्या बाबत आत्मपरिक्षण करावे. कामाच्या बाबत काही महत्त्वाचे निर्णय घ्यावेत. मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. काही कामे तुमचा कस पाहतील.

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)

सामाजिक कामात सक्रिय राहाल. तुमच्यातील मित्र भावना वाढीस लागेल. प्रत्येक बाबतीत जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. कष्टाला मागेपुढे पाहू नका. मानसिक ताण जाणवेल.

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)

तुमच्या मनातील सर्व आकांक्षा पूर्ण होतील. व्यावसायिक आघाडीवर सक्रियता वाढेल. नवीन वाहन घेण्याचा विचार कराल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. सर्वांशी मिळून-मिसळून वागाल.

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)

आत्मविश्वासाने यश मिळवता येईल. प्रयत्नातून नवीन दिशा ठरवाल. वरिष्ठांच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करा. तरूणांशी मैत्री वाढेल. योजनेनुसार कामे पार पडतील.

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)

जोडीदाराशी मतभेदाचे प्रसंग येऊ शकतात. कामाच्या व्यापाने खचून जाऊ नका. भागीदाराशी संयमाने वागावे लागेल. हितशत्रू पासून सावध राहावे. धार्मिक कामात सहभाग घ्याल.

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)

तुमच्या मनातील आनंद द्विगुणित होईल. पचनाच्या किरकोळ तक्रारी संभवतात. सहकार्‍यांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. नोकरांना चलाखीने सांभाळावे लागेल.

आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)

जोखीम सावधगिरीने उचलावी. कोणाशीही वाटाघाटी करताना सावध राहावे. जोडीदाराविषयीच्या प्रेम सौख्याला बहार येईल. आपले मत व्यवस्थित पट‍वून द्यावे. भागीदारीतून चांगला नफा मिळवाल.

आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)

जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. आर्थिक चढ-उतार संभवतात. जवळच्या नातेवाईकांची गाठ पडेल. केलेल्या कामातून आपण समाधानी असाल.

आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)

घरातील ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी. प्रेमप्रकरणाला चांगली दिशा मिळेल. प्रवासात कसलाही हलगर्जीपणा करू नका. इतरांवर फार विसंबून राहू नका. जुगाराची आवड जोपासाल.

आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)

मनातील शंकेचे निरसन करावे. अघळपघळ बोलणे टाळावे. घरातील टापटि‍पी बाबत दक्ष राहावे. मागचा पुढचा विचार न करता खर्च करू नये. नवीन जबाबदारीची जाणीव ठेवाल.

आजचे मीन राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)

आततायीपणे निर्णय घेऊ नका. प्रवासात सामानाची काळजी घ्यावी. पित्त प्रकृतीत वाढ होऊ शकते. निसर्गसौंदर्याचा अनुभव घ्याल. हातातील कलेचे कौतुक केले जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर