Shani 2026 Impacts on Zodiac Signs: वैदिक ज्योतिषात शनीदेव यांना आयुष्य, दु:ख, आजार, वेदना, विज्ञान, तंत्रज्ञान, लोखंड, खनिज तेल, नोकर, सेवक, तुरुंग इत्यादींचे कारक मानले जाते. तसेच त्यांना कर्मफळदाता आणि न्यायाधीश अशी उपाधी दिली आहे. शनीदेव साधारणपणे दीड वर्षांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात.

सन २०२६ मध्ये शनीदेव मीन राशीत प्रवेश करतील. या बदलामुळे काही राशींचे भाग्य उजळेल आणि त्यांच्यावर शनीदेवांची खास कृपा राहील. या काळात नोकरीत बढती मिळू शकते आणि करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया त्या राशी कोणत्या आहेत…

वृषभ राशी (Taurus Horoscope)

तुमच्यासाठी वर्ष २०२६ फायदेशीर ठरू शकते. कारण शनीदेव तुमच्या राशीपासून उत्पन्न आणि लाभ स्थानावर भ्रमण करत आहेत. त्यामुळे या काळात तुमच्या कमाईत मोठी वाढ होऊ शकते. नवीन-नवीन मार्गांनी पैसा मिळण्याची शक्यता आहे.

शनीदेवांच्या कृपेने आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध संयम आणि समजुतीने अधिक स्थिर होतील. हा काळ आत्मविश्वास, यश आणि धैर्य वाढवणारा आहे. तुम्हाला एखादे मोठे काम किंवा प्रोजेक्ट मिळू शकते.

तूळ राशी (Libra Horoscope)

वर्ष २०२६ तूळ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. कारण शनीदेव तुमच्या राशीपासून सहाव्या स्थानावर भ्रमण करत आहेत. तसेच ते तुमच्या राशीच्या चौथ्या आणि पाचव्या स्थानाचे स्वामी आहेत.

या काळात तुम्हाला न्यायालय किंवा कायदेशीर बाबींमध्ये यश मिळेल. तुम्ही एखादे वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. गुंतवणुकीतून किंवा प्रॉपर्टीशी संबंधित फायदा होण्याची शक्यता आहे. मित्र आणि वरिष्ठांकडून मदत मिळेल. कुटुंबात काही शुभ बातमी मिळेल, ज्यामुळे मन आनंदी राहील. तसेच तुम्ही शत्रूंवर विजय मिळवाल.

कुंभ राशी (Aquarius Horoscope)

तुमच्यासाठी वर्ष २०२६ फायदेशीर ठरू शकते. कारण शनीदेव तुमच्या राशीपासून धनस्थानावर भ्रमण करत आहेत आणि ते तुमच्या राशीचे स्वामी आहेत. त्यामुळे या काळात तुम्हाला वेळोवेळी अचानक धनलाभ होऊ शकतो. पैशांची ये-जा वाढेल आणि संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे.

कुटुंबातील सदस्यांकडून सहकार्य मिळेल आणि एखादी अडकलेली डील अचानक पूर्ण होऊ शकते. अडलेली कामे पूर्ण होतील. शनीदेवांच्या कृपेने नातेसंबंधांमध्ये स्थिरता येईल आणि आव्हानांना सामोरे जाण्याची ताकद वाढेल.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)