22nd March 2024 Panchang Marathi Rashi Bhavishya: २२ मार्च २०२४ ला आज शुक्रवारी फाल्गुन शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. शुक्रवारचा संपूर्ण दिवस व शनिवारी सकाळी ७ वाजून १८ मिनिटांपर्यंत ही तिथी कायम असणार आहे. २२ मार्चला संध्याकाळी ६ वाजून ३५ मिनिटांपर्यंत धृती योग कायम असणार आहे. मघा नक्षत्रात आज होळीपूर्व प्रदोष व्रत सुद्धा असणार आहे. आजच्या दिवसातील ग्रहमानानुसार मेष ते मीन राशीचे भविष्य कसे असणार हे पाहूया ..

२२ मार्च २०२४ पंचांग व राशिभविष्य

मेष:-जवळची प्रवासात खबरदारी घ्यावी. मानसिक द्विधावस्था वधू शकते. आवडीची कामे करण्यावर भर द्यावा. नामस्मरणासाठी वेगळा वेळ काढावा. तरूणांशी मैत्री कराल.

Chaturgrahi Yog in meen rashi
Chaturgrahi Yog : १०० वर्षानंतर चतुर्ग्रही योग; ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा, होऊ शकतो मोठा धनलाभ
Chaturgrahi Yog
४८ तासांनी ४ ग्रहांची महायुती; येत्या मंगळवारपासून ‘या’ राशी पैशाच्या बाबतीत ठरतील भाग्यवान? कुणाच्या संपत्तीत होणार वाढ?
Gudi Padwa 2024
गुढीपाडव्यापासून ‘या’ ३ राशी होतील श्रीमंत? नववर्षात शनिदेवाच्या कृपेने उत्पन्नात होऊ शकते प्रचंड वाढ
Shani Nakshatra Gochar On 6th April 2024
३ दिवसांनी शनीचे नक्षत्र गोचर होताच ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; रिकामी तिजोरी धन-धान्याने भरण्याचे संकेत

वृषभ:-तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल. फॅशनची हौस पूर्ण कराल. धार्मिक कार्यात हिरीरीने भाग घ्याल. वाणीत गोडवा ठेवाल. घरगुती कामात वेळ जाईल.

मिथुन:-मनातील संभ्रम दूर करावेत. सरकारी कामे वेळ लावू शकतात. वाताचा त्रास जाणवू शकतो. संसर्गजन्य विकारांपासून काळजी घ्यावी. वारसाहक्काची कामे चिघळू शकतात.

कर्क:-भावनेच्या भरात वाहून जाऊ नका. जोडीदाराचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न करावा. मानसिक ताण-तणावापासून दूर राहावे. वरिष्ठांची मर्जी संपादन करावी. वडीलधार्‍यांचा सल्ला घ्यावा.

सिंह:-मनातील इच्छा पूर्ण होईल. अंगीभूत कलेला प्रोत्साहन मिळेल. औद्योगिक वातावरण चांगले राहील. जोडीदाराशी सल्ला मसलत कराल. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत.

कन्या:-जोडीदाराचे उत्पन्न वाढेल. मानसिक संभ्रम दूर करावेत. वेळेचे बंधन पाळावे लागेल. कामातील द्विधावस्था त्रासदायक ठरू शकते. मुलांचे वागणे विरोधी वाटेल.

तूळ:-घरगुती परिस्थिती शांतपणे हाताळा. प्रलोभनापासून दूर राहावे. कामात आळस आड येऊ शकतो. इतरांना स्वेच्छेने मदत कराल. संयम बाळगावा लागेल.

वृश्चिक:-साहस करताना सावधानता बाळगावी. योग्य मार्गाचा अवलंब करावा लागेल. भावंडांचे प्रश्न सामोरी येतील. जोडीदाराची मर्जी राखावी लागेल. प्रवासात खबरदारी घ्यावी लागेल.

धनू:-कौटुंबिक प्रश्न शांततेने सोडवावेत. मानसिक दोलायमानता वाढू शकते. स्वत:वरील विश्वास डळमळीत होऊ देऊ नका. कायदेशीर कामात वेळ जाईल. नवीन मित्र जोडाल.

मकर:-प्रतिकूलतेतून मार्ग काढाल. अघळ पघळ गप्पा माराल. नवीन विचारांची कास धरावी लागेल. हातातील अधिकारांचा वापर करावा. चिकाटी सोडून चालणार नाही.

कुंभ:-हजरजबाबीपणे वागाल. सामुदायिक वादांपासून दूर राहावे. धार्मिक यात्रेचे योग येतील. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.

हे ही वाचा<< अमृत सिद्धी योगात आला गुढीपाडवा; चैत्र नवरात्री ते रामनवमी ५ वेळा रवी योग, ‘या’ ३ राशींना लाभेल नशीब बदलणारं वरदान

मीन:-श्रम काही प्रमाणात वाढू शकतात. कागदपत्रे जपून ठेवावीत. हस्त कलेचे कौतुक केले जाईल. अती श्रमाचा थकवा जाणवेल. योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर