24th August Panchang & Marathi Rashi Bhavishya : आज २४ ऑगस्ट २०२४ रोजी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षात पंचमी तिथी सकाळी ७ वाजून ५२ पर्यंत असेल, त्यानंतर षष्ठी तिथी सुरू होईल. तसेच रात्री ३ वाजून ०७ वाजेपर्यंत वृद्धी योग राहील. आज अश्विनी नक्षत्र संध्याकाळी ६ वाजून ६ मिनिटांपर्यंत राहील. याशिवाय रात्री एक वाजून १६ मिनिटांनी (रविवार २५ ऑगस्ट रोजी) शुक्र कन्या राशीत प्रवेश करेल. तर राहू काळ सकाळी ९ वाजता सुरु होऊन १० वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल. तसेच आज चौथा श्रावणी शनिवार सुद्धा असणार आहे. तर आज मेष ते मीन या राशींचा दिवस कसा जाईल, कोणावर असेल शंकराची कृपा जाणून घेऊ या…

२४ ऑगस्ट पंचाग व राशीभविष्य :

मेष:- नोकरीच्या नवीन संधी चालून येतील. वाहन खरेदीची इच्छा मनात येईल. मुलांबाबतची चिंता दूर होईल. आपली प्रतिभा सिद्ध करण्याची संधी मिळेल. प्रिय व्यक्तीकडून अपेक्षित सहकार्य मिळेल.

वृषभ:- मनाची चलबिचलता जाणवेल. विचार भरकटू देऊ नका. दिवस मध्यम फलदायी असेल. वादाचे मुद्दे टाळावेत. गुंतवणूक करताना जोखीम पत्करू नये.

मिथुन:- अकारण खर्च टाळावा. संमिश्र घटनांचा दिवस. कामात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. वातावरण लक्षात घेऊन काम करावे. अडकलेले धन प्राप्त होण्याची शक्यता.

कर्क:- कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. नवीन व्यवसायास गती मिळेल. तुमचा मान वाढेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नोकरदार वर्गाला उत्तम दिवस.

सिंह:- चोख हिशोब ठेवावा. पैसा चांगल्या कामासाठी खर्च कराल. मान, सन्मानात वाढ होईल. दिवसभरात सकारात्मक वार्ता मिळेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

कन्या:- लोकांकडून वाहवा मिळवाल. उत्तम सामाजिक दर्जा प्राप्त होईल. कामाचा ताण जाणवू शकतो. अति विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. कामातील प्रगतीकडे लक्ष ठेवा.

तूळ:- स्वत:च्या सुखासाठी पैसा खर्च कराल. प्रतिपक्षावर मात कराल. धनलाभाचे योग जुळून येतील. तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. परिस्थितीचा ताळमेळ साधाल.

वृश्चिक:- कौटुंबिक ताणतणाव टाळावेत. मित्रांशी जवळीक साधाल. मुलांची चिंता लागून राहील. क्रोधावर नियंत्रण ठेवावे. अधिकार्‍यांची गाठ पडेल.

धनू:- पैशाच्या बाबतीत हात आखडता घ्याल. जि‍भेवर ताबा ठेवावा. आर्थिक बाजू सुधारेल. आहाराची पथ्ये पाळावीत. मिळकतीचा नवीन स्त्रोत सापडेल.

मकर:- जुन्या विचारांना मनातून काढून टाका. भावंडांशी मतभेदाची शक्यता. दिवस मध्यम फलदायी. व्यापारी वर्गाने सबुरीने घ्यावे. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे.

कुंभ:- मानसिक स्वास्थ्य ढळू देऊ नका. नवीन संधी मिळण्याची चिन्हे दिसू लागतील. विनाकारण प्रवास घडेल. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळावीत.

मीन:- प्रतिस्पर्ध्याबरोबर हुशारीने वागावे. पैशाची गुंतवणूक समजून उमजून करावी. मानसिक ताण घेऊ नये. कार्य व अधिकार वाढतील. कौशल्याचा वापर करावा लागेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर