26th May 2024 Marathi Panchang & Rashi Bhavishya: २६ मे २०२४ ला वैशाख महिन्यातील तृतीया व चतुर्थी तिथी एकत्र असणार आहे. रविवारी संध्याकाळी ६ वाजून ६ मिनिटांपर्यंत तृतीया तिथी असणार आहे व त्यानंतर चतुर्थीचा प्रारंभ होईल. यादिवशी साध्य योग व मूळ नक्षत्राचा योगायोग जुळून आलेला आहे. आजच्या दिवशी सूर्यदेव हे वृषभ राशीत असणार आहे व चंद्र धनु राशीत विराजमान असणार आहे. द्रिक पंचांगानुसार आज संध्याकाळी ५ वाजून २८ मिनिटांपासून ते ७ वाजून १२ मिनिटांपर्यंत राहूकाळ आहे. तर आजच्या दिवसाच्या शुभ मुहूर्तांमध्ये सकाळी ११ वाजून ५१ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून ४६ मिनिटांपर्यंतचा अभिजात मुहूर्त समाविष्ट असणार आहे. याशिवाय आज एकदंत संकष्टी चतुर्थी असणार आहे. आजचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा असणार हे पाहूया..

२६ मे पंचांग व राशी भविष्य

मेष:-नसते साहस करायला जाऊ नका. दूर वरच्या लोकांशी संपर्क वाढेल. मानसिक आंदोलने लक्षात घ्यावीत. आपणच आपल्या रागाला कारणीभूत होऊ शकतो. जमिनीच्या कामात लक्ष घालावे.

वृषभ:-मित्रांकडून लाभाची शक्यता. चेष्टा मस्करीत शब्द जपून वापरा. जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल. निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्याल. कामातील बदल व्यवस्थित लक्षात घ्या.

मिथुन:-संभाषण कौशल्याची आवड पूर्ण कराल. विरोधकांचा विरोध मावळेल. कामात सहकार्‍यांची उत्तम साथ होईल. कामे दिरंगाईने होण्याची शक्यता. सामाजिक वादात अडकू नका.

कर्क:- कोणावरही जास्त विसंबून राहू नका. अधिकारी वर्गाचे मार्गदर्शन घ्यावे. मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाईल. स्त्री सौख्यात रमून जाल.

सिंह:-मित्रमैत्रिणींचा फड जमवाल. आवडत्या ठिकाणाला भेट देण्याचे ठरवाल. पत्नीची नाराजी दूर करावी लागेल. घरगुती कामात दिवस जाईल. हाताखालील नोकरांचे सहकार्य लाभेल.

कन्या:-जवळचा प्रवास मजेत पार पडेल. छंद जोपासला वेळ मिळेल. मानसिक स्थैर्य जपण्याचा प्रयत्न करावा. बाहेरील अन्न पदार्थ खाणे टाळावे. महत्त्वाची कागदपत्रे पुढे सरकतील.

तूळ:-जोडीदाराच्या हट्टाला बळी पडाल. आवडते पदार्थ खाण्याची हौस पूर्ण होईल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. क्षुल्लक गोष्टींमुळे येणारा राग कमी करावा. नवीन ठिकाणी गुंतवणुकीला वाव आहे.

वृश्चिक:-जोडीदाराच्या इच्छेविरूद्ध जाऊ नका. कौटुंबिक वातावरण तप्त राहील. कामाचा विस्तार वाढवता येईल. भागीदारीत तुमच्या विचाराला प्राधान्य राहील. व्यावहारिक दृष्टीकोन ठेवावा लागेल.

धनू:-इच्छेला मुरड घालावी लागेल. भावंडांशी वाद वाढवू नयेत. जुन्या कामात अधिक वेळ गुंतून पडाल. जोडीदाराच्या बुद्धिकौशल्याचे आश्चर्य वाटेल. काटकसरीवर भर द्यावा.

मकर:-नातेवाईक तुमच्या विरुद्ध जाऊ शकतात. इतरांच्या अविश्वासाला बळी पडू नका. कोणाचाही सल्ला घेताना सावध राहा. अविचाराने वागून चालणार नाही. घेतलेल्या कष्टाचे चीज होईल.

हे ही वाचा<< “जुलै २०२४ पर्यंत..”, नितीन गडकरींसाठी ज्योतिषांची महत्त्वाची भविष्यवाणी; म्हणाले, “राजकीय आयुष्यात पुरेसे पर्याय..”

कुंभ:-रागाच्या भरात कोणतेही कृती करू नका. बुद्धिकौशल्याचा योग्य वेळी वापर करावा. अचानक डोकेदुखीचा त्रास जाणवेल. कामात स्थिरता ठेवावी. कुटुंबात तुमचा दबदबा राहील.

मीन:-जवळचे नातेवाईक भेटतील. मनातील आकांक्षा पूर्ण होतील. गुरूजनांच्या आशीर्वादाचा लाभ होईल. तुमच्यातील महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर