27 October Horoscope Mangal Gochar: ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या गोचराला खूप महत्त्व दिलं जातं. त्यामध्ये मंगळाचं गोचर खास मानलं जातं, कारण मंगळाला सर्व ग्रहांचा सेनापती म्हटलं जातं. लवकरच मंगळ स्वतःच्या म्हणजेच वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे.

ज्योतिषानुसार, जेव्हा मंगळ आपल्या स्वतःच्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा “रुचक राजयोग” तयार होतो, जो पंच महापुरुष योगांपैकी एक शक्तिशाली योग आहे. मंगळाच्या या बदलाचा परिणाम फक्त व्यक्तीच्या जीवनावरच नाही, तर देश-विदेशावरही होतो.

म्हणून ज्योतिष सांगतात की मंगळाचं हे गोचर काही राशींसाठी भाग्यशाली ठरू शकतं. या राशींना करिअर आणि नोकरीत चांगले यश मिळू शकते. चला तर मग पाहू या, मंगळाच्या या गोचरामुळे कोणत्या राशींना फायदा होईल.

मिथुन राशी (Gemini Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळाचं गोचर मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरू शकतं. तुमचा आत्मविश्वास आणि काम करण्याची क्षमता वाढेल. करिअरमध्ये नवीन दिशा मिळेल. महत्त्वाच्या लोकांशी संपर्क फायदेशीर ठरेल. ही वेळ तुमची नेतृत्व क्षमता वाढवेल आणि तुम्ही आपल्या क्षेत्रात चांगला प्रभाव टाकाल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. अडकलेली कामं पूर्ण होतील. आरोग्याच्या बाबतीतही आराम मिळेल.

सिंह राशी (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी ही वेळ सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वासाने भरलेली असेल. बऱ्याच दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होऊ लागतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल, विशेषतः गुंतवणूक किंवा व्यवसायातून फायदा होण्याची शक्यता आहे. नवीन प्रोजेक्ट्स किंवा जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्यामुळे तुमची व्यावसायिक प्रतिमा आणखी चांगली बनेल. कौटुंबिक जीवनात सौहार्द राहील. प्रवासातूनही फायदा मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा होईल.

कुंभ राशी (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी ही वेळ बदल आणि प्रगती घेऊन येईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल आणि पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत स्थिरता येईल. एखाद्या गुंतवणुकीतून किंवा मालमत्तेतून फायदा होऊ शकतो. ही वेळ करिअरला नवीन दिशा देणारी ठरेल. जोडीदार किंवा कुटुंबाच्या मदतीने आत्मविश्वास वाढेल. संयम आणि शांतपणे काम केलं तर नक्कीच यश मिळेल.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)