27 October Horoscope: २७ ऑक्टोबर २०२५ रोजी मंगळ ग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर ७ डिसेंबर २०२५ पर्यंत म्हणजेच सुमारे ४० दिवस मंगळ स्वतःच्या राशीत राहील. जेव्हा मंगळ आपल्या स्वराशीत म्हणजेच वृश्चिक राशीत असतो, तेव्हा ‘रूचक राजयोग’ तयार होतो. २७ ऑक्टोबरपासून तयार होणारा हा राजयोग ५ राशींसाठी खूप शुभ आणि लाभदायक ठरेल.

मिथुन राशी (Gemini Horoscope)

मंगळाचं गोचर मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरेल. तुमची कमाई वाढेल. गुंतवणुकीतून फायदा होईल. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल. व्यवसायात वाढ होईल. वैवाहिक जीवनात प्रेम आणि विश्वास वाढेल.

कन्या राशी (Virgo Horoscope)

मंगळाचं राशी बदल कन्या राशीच्या लोकांना चांगले फळ देईल. एखादी शुभ बातमी मिळू शकते. तुम्ही आनंदी राहाल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ यशदायी आहे. धनलाभ होईल.

मकर राशी (Capricorn Horoscope)

मंगळाचं स्वतःच्या राशीत गोचर होऊन तयार झालेला रूचक राजयोग मकर राशीच्या लोकांना फायदा देईल. तुमची कमाई वाढेल आणि तुम्ही बचत व गुंतवणुकीतही यशस्वी व्हाल. तब्येत चांगली राहील. जवळच्या लोकांकडून मदत मिळेल.

कर्क राशी (Cancer Horoscope)

मंगळाचं गोचर तुमच्या जीवनात सकारात्मक बदल आणेल. जे लोक सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत, त्यांना यश मिळू शकते. मुलांकडून आनंद मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ यशदायी आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल.

मीन राशी (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी मंगळाचं गोचर भाग्याचा साथ देईल. तुमच्या बुद्धीमत्तेच्या जोरावर तुम्ही फायदा मिळवाल. आर्थिक प्रगती होईल. या काळात जर तुम्ही कोणाशी वाद टाळलात, तर तुम्हाला मोठा लाभ होईल.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)