29th September 2024 Horoscope and Panchang : आज २९ सप्टेंबर २०२४ रोजी भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी आहे. द्वादशी तिथी रविवारी संध्याकाळी ४ वाजून ४८ मिनिटांपर्यंत आहे. आज मघा नक्षत्रात साध्य योग जुळून आला आहे. आज १२ वाजून २७ मिनिटांपर्यंत साध्य योग तर ६ वाजून १९ मिनिटांपर्यंत मेघा नक्षत्र राहील. आज राहू काळ ४ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत असेल. तर मेष ते मीनचा रविवार कसा जाईल हे आपण जाणून घेऊ या…

२९ सप्टेंबर पंचांग व राशिभविष्य :

मेष:- व्यावसायिक स्तरावर एखादी चांगली घटना घडेल. स्वप्नाळू वृत्तीतून बाहेर या. एखादी दिलासादायक घटना घडेल. भाग्याची साथ लाभेल. आर्थिक घडी सुधारेल.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

वृषभ:- तब्येतीला जपा. छोट्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. उपयोगी वस्तूंची खरेदी केली जाईल. मानसिक प्रसन्नता लाभेल. जवळचे मित्र भेटतील.

मिथुन:- मनासारखी घटना घडेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. विक्षिप्त लोकांपासून दूर रहा. वेळेबरोबर चालावे लागेल. प्रगतीला चांगला वाव मिळेल.

कर्क:- आवश्यक तेथेच पुढारीपणा स्वीकारावा. गणेशाची आराधना करावी. हस्त कौशल्यासाठी वेळ काढावा. करियर विषयी चिंता वाटू लागेल. आपल्याच विचारात मग्न राहाल.

सिंह:- मुलांकडून चांगली बातमी समजेल. हवी असलेली उत्तरे मिळतील. व्यवसायिकांनी सतर्क राहावे. कामाच्या स्वरुपात काही बदल करून पहावेत. प्रयत्नांची कास सोडू नये.

कन्या:- कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पहावे. जोडीदाराशी मतभेद टाळा. धावपळीचा दिवस. मात्र धावपळ लाभदायक ठरेल. कौटुंबिक खर्चाचा ताळमेळ घालावा.

तूळ:- आपल्याच मुद्यावर अडून राहाल. मनातील संभ्रम दूर सारावा. उगाचच एखादी चिंता सातवेल. मानसिक दुर्बलता टाळावी. हित शत्रुंवर लक्ष ठेवावे.

वृश्चिक:- गरज नसेल तर फार बोलू नका. सामाजिक कामात मदत नोंदवाल. कर्तुत्वाला वाव मिळेल. उगाच लपवा छपवी करू नका. बौद्धिक ताण जाणवेल.

धनू:- धार्मिक कामासाठी खर्च कराल. भागीदारीत विचारपूर्वक गुंतवणूक करावी. जुन्या गोष्टी फायदेशीर ठरू शकतात. जुनी येणी प्राप्त होतील. कौटुंबिक जबाबदार्‍या चिकाटीने पार पाडाव्यात.

मकर:- कामावर अधिक निष्ठा ठेवावी. कष्टाला मागे पडू नका. धार्मिक कामात सहभागी होण्याची संधी मिळेल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास मिळेल. मित्रांसोबत वेळ घालवाल.

कुंभ:- समोरील संधीचा लाभ घ्यावा. समोरील व्यक्तीवर चटकन विश्वास ठेऊ नका. अधिकार्‍यांचा पाठिंबा मिळवाल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. वेळेचा सदुपयोग करावा.

मीन:- अनावश्यक खरेदी केली जाईल. आहारात अति तिखट पदार्थ टाळावेत. प्रगतीच्या दृष्टीने पाऊल पुढे टाकाल. वादाच्या मुद्यात अडकू नका. व्यावसायिक स्थैर्याकडे लक्ष द्यावे.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader