2nd April 2024 Panchang & Rashi Bhavishya: २ एप्रिल २०२४ ला आज फाल्गुन कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी असणार आहे. मंगळवारी रात्री ८ वाजून ९ मिनिटांपर्यंत अष्टमी कायम असेल. आजच्या दिवशी संध्याकाळी ६ वाजून ३५ मिनिटांपर्यंत परीघ योग असणार आहे. आज रात्री १० वाजून ४९ मिनिटांपर्यंत पूर्वाषाढा नक्षत्र जागृत असणार आहे. आजची तिथी ही शीतलाष्टमी म्हणून ओळखली जाते व आजच्याच दिवशी कालाष्टमी व्रत सुद्धा असणार आहे. आजच्या दिवशी मेष ते मीन राशीच्या नशिबात काय असणार हे पाहूया..
२ एप्रिल २०२४: मेष ते मीन राशींचे भविष्य
मेष:-खाण्यावर बेताने ताव मारा. विद्यार्थ्यांसमोर नवीन संधी चालून येईल. शेअर्स मध्ये गुंतवणूक करावी. मनातील चुकीचे विचार काढून टाकावेत. आशावादी दृष्टिकोन ठेवावा.
वृषभ:-धार्मिक गोष्टीत प्रगती कराल. हवामानानुसार काही बदल करावेत. महत्त्वाची कामे पार पडतील. प्रामाणिकपणा व सचोटी सोडू नका. मित्रांची योग्य वेळी मदत मिळेल.
मिथुन:-उपासनेमुळे काही त्रास कमी होतील. काही क्षणिक आनंद घ्याल. जबाबदारी सक्षमपणे पेलाल. निर्धास्तपणे वागू नका. जोडीदाराचे मत जाणून घ्यावे.
कर्क:-जोडीदाराच्या कर्तृत्वाला वाव मिळेल. वडीलधार्यांशी मतभेद संभवतात. कौटुंबिक नाराजी दूर करावी. सार्वजनिक कामात कौतुक केले जाईल. नोकरदारांनी नरमाईची भूमिका घ्यावी.
सिंह:-योग्य अयोग्याची शहानिशा करावी. भावनेच्या आहारी जाऊ नका. कलाकारांच्या कलेचे कौतुक केले जाईल. सांधेदुखीचा त्रास संभवतो. चटकन कोणावरही विश्वास ठेवू नका.
कन्या:-धीर व संयम बाळगावा लागेल. आरोग्याच्या क्षुल्लक तक्रारी राहतील. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. कामाच्या ठिकाणी सतर्क राहावे. चारचौघांत कौतुक केले जाईल.
तूळ:-भावंडांशी वादाचे प्रसंग संभवतात. सारासार विचारातून कृती करावी. लॉटरी सारख्या व्यवहारातून फायदा संभवतो. देणी फेडता येतील. सासुरवाडीकडून शुभवार्ता मिळेल.
वृश्चिक:-अधिक कष्टाची गरज पडेल. गणेशाची उपासना करावी. वैवाहिक सौख्यात मिठाचा खडा पडू देऊ नका. मनोरंजनाचे बेत आखले जातील. विरोधकांची संख्या वाढू शकते.
धनू:-घरातील ताणतणाव दूर करावेत. ज्येष्ठ मंडळींचा सल्ला मानावा. कोणतेही टोकाची भूमिका घेऊ नये. आर्थिक व्यवहारात दक्षता बाळगावी. धार्मिक कामात मन गुंतवावे.
मकर:-लेखन कलेला वाव मिळेल. चटकन मत प्रदर्शित करू नका. जुन्या गोष्टी उगाळत बसू नये. गरज पडल्यास शांत राहावे. आरोग्याची काळजी घ्यावी.
कुंभ:-कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. सामुदायिक गोष्टींचे भान ठेवावे. घरातील कामात गुंग व्हाल. नवीन मित्र जोडावेत. आध्यात्मिक गोष्टींकडे कल वाढेल.
हे ही वाचा<< ७ एप्रिलपर्यंत लक्ष्मी नारायणासह ३ राजयोग बनल्याने कर्क- कन्यासह ‘या’ राशी जगतील अच्छे दिन, १२ राशींचे भविष्य वाचा
मीन:-छंद जोपासायला वेळ द्या. अधिकारी व्यक्तींचा वेळोवेळी सल्ला घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा. मनाविरुद्ध प्रवास करावा लागू शकतो. सडेतोडपणे मत मांडाल.
– ज्योतिषी विद्याधर करंदीकर