Guru Gochar In Vrushbh: एप्रिल २०२३ मध्ये गुरूने मेष राशीत प्रवेश केला होता त्यानंतर आता तब्बल ३७४ दिवसांनी गुरुदेव गोचर करून वृषभ राशीत स्थित झाले आहेत. १ मे २०२३ ला गुरुचे वृषभ राशीतील गोचर पार पडले. यंदाच्या गोचरनंतरही गुरुदेव संपूर्ण वर्षभर वृषभ राशीत स्थित असणार आहेत. परिणामी २०२५ पर्यंत काही राशींना गुरूचा तगडा प्रभाव अनुभवायला मिळू शकतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ ही शुक्राच्या स्वामित्वाची रास आहे. शुक्र हा धन, वैभव व संपत्तीचा कारक मानला जातो तर गुरु हा बुद्धी, बळ, शांतीचा ग्रह मानला जातो. शुक्राच्या प्रभावाने वैवाहिक आयुष्य, प्रेम संबंध सुधारण्यास मदत होऊ शकते तर गुरुचे बळ एखाद्या राशीला बौद्धिक व वैचारिक सामर्थ्य देऊ शकते. या दोन्ही ग्रहांच्या प्रभावाने येत्या काळात वृषभसहित अन्य दोन राशींना प्रचंड लाभ होण्याची संधी आहे. या राशी कोणत्या हे पाहूया..
गुरु गोचराने समृद्ध होणाऱ्या राशी
वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)
वैवाहिक जीवनातील गोडवा वाढीस लागेल. या राशीच्या आर्थिक मिळकतीला जुन्या गुंतवणुकीची जोड मिळू शकते. तुमच्या पती- पत्नीच्या रूपात लक्ष्मी माता तुमच्याकडे वास्तव्यास येऊ शकते. आर्थिक फायदे वाढण्यासह खर्चाचे आकडे सुद्धा वाढू शकतात, तुम्हाला स्वतःच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य नियोजन करणे महत्त्वाचे असेल. गुंतवणुकीवर अधिकाधिक भर द्या. बुद्धीच्या कामांमध्ये तुम्ही अव्वल राहाल. तुम्हाला डिसेंबरपर्यंत तुमच्या कर्माचे इतके उत्तम फळ मिळणार आहे की तुम्ही सुरु केलेल्या कामातूनच कोट्याधीश होऊ शकता. कर्माचे फळ प्राप्त करण्यासाठी सचोटीने मेहनत कायम ठेवावी लागेल. आरोग्याची काळजी घ्या.
कन्या रास (Virgo Rashi Bhavishya)
वृषभ राशीत गुरूच्या प्रवेशाने कुबेर योग निर्माण होणार आहे, त्यामुळे कन्या राशीला विशेष लाभाचे योग आहेत. आपली अडकून पडलेली कामे वेग प्राप्त करतील. एक एक काम मार्गी लागत असताना त्यातून प्राप्त होणाऱ्या धनाचे प्रमाणही वाढीस लागेल. पैसे येतात, तसे जातात हा नियम लक्षात ठेवून खर्चाचे नियोजन करावे. करिअरमध्ये प्रगती मिळवून देणारं एखादं अत्यंत महत्त्वाचं काम आपल्याकडे सोपवलं जाईल. कामाच्या निमित्ताने परदेशात प्रवासाचे योग निर्माण होत आहे. संतती प्राप्तीच्या बाजूने एखादी गोड बातमी कानी येऊ शकते.
हे ही वाचा<< ३१ मेपर्यंत ‘या’ राशींना मिळेल सुखाचा गारवा; पहिल्या दिवसापासून कुंडलीत मोठे बदल, लाभ कुणाला? १२ राशींचे भविष्य वाचा
सिंह रास (Leo Rashi Bhavishya)
सिंह राशीला सुद्धा वृषभ राशीत निर्माण झालेला कुबेर योग लाभाची नांदी ठरू शकतो. व्यापारी वर्गाला एखादी विदेशी डील पूर्ण करता येईल ज्यामुळे परदेशी चलनातून आर्थिक मिळकत होण्याची शक्यता वाढेल. जोडीदारासह चालू असणारे हेवेदावे व भांडणे दूर होतील. गुरु व शुक्राच्या प्रभावाने तुम्हाला मनाला शांती व कामाला गती प्राप्त होऊ शकेल. कुटुंबात एखादे लग्न कार्य योजले जाईल.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)