वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट अंतराने शुभ आणि अशुभ योग तयार करतात, ज्याचा परिणाम मानवी जीवनासह पृथ्वीवर दिसून येतो. अशातच आता जवळपास २० वर्षांनंतर एकाच वेळी ४ राजयोग तयार होत आहेत. ज्यामध्ये शश, नीचभंग, बुधादित्य आणि हंस यांचा समावेश आहे. या ४ राजयोगांचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर राहणार आहे. परंतु ३ राशी अशा आहेत, ज्यांना या काळात धनलाभ होऊ शकतो शिवाय त्यांची विविध क्षेत्रात प्रगती होण्याची दाट शक्यता आहे. त्या ३ भाग्यवान राशी कोणत्या आहेत जाणून घेऊया.

कुंभ राशी –

कुंभ राशीच्या लोकांसाठी ४ राजयोग तयार होणं शुभ ठरु शकतं. कारण तुमच्या कुंडलीतील लग्न स्थानात शश राजयोग तयार होत आहे आणि धनस्थानात नीचभंग राजयोग तयार होत आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. तसंच तुम्ही बोलण्याने अनेक लोकांना प्रभावीत करु शकता. तुमच्या व्यक्तिमत्त्वातही काही सुधारणा पाहायला मिळू शकते. या काळात तुमचे तुमच्या जोडीदाराशी चांगले संबंध राहू शकतात. तसंच ज्यांना पार्नटरशिपमध्ये काही काम सुरू करायचे असेल तर ते करू शकतात.

मकर राशी –

(हेही वाचा – १४ एप्रिलपर्यंत ‘या’ ५ राशींच्या नशिबाला पूर्ण कलाटणी? २३ दिवस धनलाभाचे योग, भाग्यात दिसू शकते सूर्यासम तेज)

चार राजयोगांची निर्मिती मकर राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकते. कारण तुमच्या गोचर कुंडलीच्या तिसऱ्या स्थानी गजकेसरी, बुधादित्य आणि नीचभंग राजयोग तयार होत आहेत. त्यामुळे यावेळी तुमच्या धैर्यात आणि शौर्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तर ज्या लोकांचा व्यवसाय परदेशाशी संबंधित आहे त्यांना चांगला नफा मिळू शकतो. या काळात मकर राशीतील लोक मालमत्ता खरेदी करू शकतात. अविवाहित लोकांचे लग्न ठरण्याची शक्यता आहे. तसंच तुम्हाला भावा-बहिणींचे सहकार्य मिळू शकते. मार्चनंतर नोकरदारांना प्रमोशन मिळण्यासह त्यांची बदली होण्याचीही शक्यता आहे.

मेष राशी –

या ४ राजयोगाची निर्मिती मेष राशीतील लोकांसाठी आनंददायी आणि फायदेशीर ठरू शकते. कारण हा योग तुमच्या राशीच्या दुसऱ्या स्थानी तयार होत आहे. त्यावेळी तुम्हाला अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच यावेळी तुमच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात. शिवाय या काळात तुमची आर्थिक स्थितीही सुधारु शकते. या राजयोगांच्या प्रभावाने तुम्हाला उत्पन्नाचे इतर स्रोत मिळू शकतात. यासोबतच बेरोजगारांना नवीन नोकरीची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)