Lakshmi Narayan Yog Effect 2024: ज्योतिषशास्त्रानुसार कोणताही ग्रह जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचा प्रभाव सर्व १२ राशींवर कमी अधिक, शुभ- अशुभ स्वरूपात होत असतो. या प्रवासात जर या ग्रहाची एखाद्या अन्य ग्रहासह युती झाली तर त्यातून अनेकदा राजयोग सुद्धा निर्माण होत असतात. १२ फेब्रुवारीला सुद्धा असाच एक महत्त्वाचा राजयोग निर्माण होणार आहे. पूर्ण ८ दिवस या ग्रहाचा प्रभाव कायम असणार आहे त्यामुळे १२ ते २० फेब्रुवारी दरम्यान काही प्रभावित राशींना प्रचंड धनलाभ होऊ शकतो. मकर राशीमध्ये होणारी ही बुध शुक्राची युती लक्ष्मी नारायण राजयोगाची निर्मिती करणार आहे, ज्यामुळे तीन राशींच्या नशिबाचा तारा चमकणार आहे. असं म्हणतात, जेव्हाही बुध व शुक्राची युती होते तेव्हा त्यातून हा लक्ष्मी नारायण राजयोग तयार होतो पण यात जर बृहस्पती देवगुरुची जोड मिळाली तर हा योग अधिकच फायदेशीर ठरतो.
लक्ष्मी नारायण योग 2024 कधी सुरु होईल?
हिंदू पंचांगानुसार बुध ग्रह मकर राशीत १ फेब्रुवारीला दुपारी २ वाजून २९ मिनिटांनी प्रवेश करणार आहे. आणि २० फेब्रुवारीला सकाळी ६ वाजून ०७ मिनिटांपर्यंत बुध मकर राशीतच विराजमान असणार आहे. १२ फेब्रुवारीच्या दिवशीच सकाळी ५ वाजता शुक्र सुद्धा मकर राशीत प्रवेश करणार. शुक्र पुढे ७ मार्चपर्यंत मकर राशीतच कायम असणार आहे. अशातच २० फेब्रुवारीपर्यंत बुध- शुक्राची युती व लक्ष्मी नारायण राजयोगाचा प्रभाव सक्रिय असणार आहे.
लक्ष्मी नारायण योग बनल्याने ‘या’ राशी होतील गडगंज श्रीमंत
मेष रास (Aries Rashi Bhavishya)
ज्योतिषशास्रानुसार मकर राशीत तयार होणारा लक्ष्मी नारायण राजयोग मेष राशीच्या मंडळींसाठी फायदेशीर सिद्ध होणार आहे. विशेषतः करिअरच्या अनुषंगाने आपल्याला अत्यंत लाभदायक असा हा काळ असणार आहे. शुक्र व बुध एकत्र येऊन आपल्या आर्थिक कक्षा रुंदावू शकतात, तुम्हाला मिळकतीचे स्रोत मिळू शकतात. इतकंच नव्हे तर या कालावधीत आपले अडकून पडलेले पैसे सुद्धा परत येतील. गुंतवणुकीतून मोठा परतावा लाभू शकतो. आर्थिक स्थिती भक्कम करून जाणारे हे ८ दिवस आपल्या संपूर्ण वर्षाचा ताण कमी करण्यासाठी मदतीचे ठरतील. नोकरीची संधी चालून येऊ शकते.
मिथुन रास (Gemini Rashi Bhavishya)
१२ फेब्रुवारीला लक्ष्मी नारायण राजयोग तयार होताच एका एका टप्प्यात आपल्याला प्रचंड लाभ होणार आहे. आपल्यावर माता लक्ष्मीची विशेष कृपा असणार आहे. धन- संपत्ती वाढून आपल्याला समाजात एक वेगळे स्थान निर्माण करता येईल. आपल्याला कामाच्या ठिकाणी पदोन्नती व पगारवाढ लाभण्याची शक्यता आहे. इतकंच नव्हे तर व्यावसायिकांना या कालावधीत बुधाची विशेष कृपा लाभू शकते. बुध हा वैभवकारक मानला जातो. या काळात तुम्ही सुरु केलेल्या कामाचे परिणाम सकारात्मक असतील. नवीन व्यवसाय सुरु करणार असल्यास हा कालावधी शुभ ठरू शकते. कामाची सुरुवात करण्यासाठी मागे हटू नका.
हे ही वाचा << ३ फेब्रुवारी पंचांग: पौष शनिवारी ‘या’ राशी होतील आर्थिक बाजूने प्रबळ तर ‘या’ मंडळींची होईल चिडचिड, १२ राशींचे भविष्य
कन्या रास (Virgo Rashi Bhavishya)
लक्ष्मी नारायण योग हा कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ फळप्राप्ती घेऊन येणार आहे. या कालावधीत तुम्हाला परदेशात नोकरीची संधी मिळू शकते. कामाच्या निमित्ताने प्रवास घडू शकतो. या ८ दिवसात तुमचा बँक बॅलन्स वाढू शकतो. मागील काही दिवसांपासून चालू असलेली आर्थिक चणचण कमी होऊ शकते. सर्वात मोठा लाभ आपल्या आरोग्याच्या बाबत घडून येऊ शकतो. जुने आजार आपली पाठ सोडतील.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)