आचार्य चाणक्य हे महान विद्वान होते. त्यांना प्रत्येक विषयाचे सखोल ज्ञान होते. त्यांनी चाणक्य नीतिमध्ये सर्व मानवी समस्यांचे समाधान सांगितले आहे. त्यांच्या काही कल्पना आणि धोरणे अतिशय कठोर आहेत. पण त्यामागे फक्त माणसाचे कल्याणच दडलेले आहे. चाणक्यची धोरणे आजही किती प्रासंगिक आहेत आणि चाणक्य नीतिच्या धोरणाने आपल्या जीवनातील किती समस्यांचा अंत होऊ शकतो हे तुम्हाला माहीत आहे, म्हणून आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचं आयुष्य उध्वस्त होऊ शकतं. चला जाणून घेऊया काय आहेत या गोष्टी…

तुम्ही तुमच्या घरातील ज्येष्ठ मंडळींकडून हे ऐकले असेल की घरात तुटलेली काच असणं शुभ नाही. जर तुमच्या घरातील काच पुन्हा-पुन्हा तडकत असेल तर याचा अर्थ असा होऊ शकतो की, तुम्ही लवकरच मोठ्या संकटात सापडणार आहात.म्हणून जर तुमच्या घरात तुटलेली काच असेल तर ती लवकरात लवकर काढून टाका.

आणखी वाचा : Chanakya Niti : चुकूनही या ३ गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा आयुष्यभर पश्चाताप करत बसाल

एकदा शरीराला एखाद्या रोगाची लागण झाली की, त्यातून मुक्त होणे खूप कठीण होऊन बसते. औषधांनी रोग बरा होऊ शकतो, परंतु थोडासा निष्काळजीपणा तुम्हाला महागात पडू शकतो. चाणक्य नीतिनुसार, जेव्हा एखादी व्यक्ती कोणत्याही आजाराने ग्रस्त असते तेव्हा त्याने आपल्या शरीराची जाणीव ठेवली पाहिजे.

घरामध्ये किंवा अंगणात तुळशीचे रोप लावणे खूप शुभ असते हे आपण जाणतो. मात्र, चाणक्य सांगतात की, तुळशीचे रोप घरामध्ये सुकलेलं शुभ नाही. म्हणजे आयुष्यात काही संकटे येणार आहेत, याचे ते संकेत असते. तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे घरात तुळशीचे रोप सुकू देऊ नका.

आणखी वाचा : बुधादित्य राजयोगमुळे या ३ राशींचे भाग्य उजळू शकतं, सूर्य आणि बुधाची असेल विशेष कृपा

आचार्य चाणक्य सांगतात की, कोणत्याही घरात दिवस-रात्र भांडणे होत असतील तर त्या घरात लक्ष्मी-कुबेराचे वास्तव्य करत नाही. घरात तणावाचे वातावरण असल्याने घरातील सुख-शांती पूर्णपणे नष्ट होऊ शकते आणि तुम्हाला खूप मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जर तुमच्या घरातील भिंतींवर नेहमी ओलसरपणा असेल आणि पेंटर पुन्हा पुन्हा रंगवूनही समस्या दूर होत नसेल तर ते तुमच्या आयुष्यात काहीतरी चुकीचे घडणार असल्याचे संकेत असते. यामुळे तुमच्या घरात निराशा आणि वाईट परिणाम होऊ शकतात. त्यामुळे घराच्या भिंतींचा ओलसरपणाकडे दुर्लक्ष करू नका.