वैदिक ज्योतिषानुसार ग्रहांच्या हालचाली मानवी जीवनावर मोठा प्रभाव टाकतात. सूर्य हा ग्रहांचा राजा मानला जातो आणि तो प्रत्येक महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत भ्रमण करतो. सध्या सूर्य देव तूळ राशीत प्रवेश करत आहेत आणि नोव्हेंबर २०२५ मध्ये ते वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहेत. ही रास मंगळ देवाची आहे आणि सूर्य-मंगळ हे एकमेकांचे मित्र ग्रह मानले जातात. त्यामुळे हा गोचर काही राशींसाठी विशेष शुभ ठरणार आहे. या काळात तीन राशींच्या लोकांना भाग्याची साथ मिळणार असून करिअर, आर्थिक स्थिती आणि नातेसंबंध या तिन्ही क्षेत्रात सुधारणा दिसून येईल.
वृश्चिक राशी (Scorpio Zodiac)
सूर्यदेवांचे हे गोचर वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. सूर्य तुमच्या कुंडलीतील प्रथम भावात भ्रमण करणार आहेत. त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात आत्मविश्वास आणि तेज वाढेल. कामकाजातील अडचणी दूर होतील आणि करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. प्रेमसंबंध आणि दांपत्य जीवनात गोडवा येईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.
मकर राशी (Capricorn Zodiac)
मकर राशीच्या लोकांसाठी सूर्याचा हा गोचर अकराव्या भावात होणार आहे. त्यामुळे या काळात आयात वाढ, गुंतवणुकीत लाभ आणि मोठ्या प्रोजेक्टमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. मित्रमंडळी आणि वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. शेअर मार्केट, प्रॉपर्टी किंवा लॉटरीसंबंधी गुंतवणुकीत फायदा होऊ शकतो. भाग्याची साथ मिळेल आणि आर्थिक स्थैर्य मजबूत होईल.
कुंभ राशी (Aquarius Zodiac)
कुंभ राशीच्या लोकांसाठी सूर्यदेव कर्मभावात गोचर करणार आहेत. त्यामुळे हा काळ करिअर आणि व्यवसायात प्रगतीचा आहे.
नोकरीत प्रमोशन किंवा नवी जबाबदारी मिळू शकते. व्यापार्यांना अचानक मोठा नफा होण्याची शक्यता आहे. शत्रूंवर विजय मिळेल आणि आत्मविश्वासात वाढ होईल. वडीलांशी संबंध अधिक दृढ होतील आणि समाजात प्रतिष्ठा वाढेल.
