उद्या सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी बुध ग्रह मेष राशीत मार्गी होणार आहे. चार राशीच्या लोकांसाठी बुधाचे मार्गी होणे शुभ ठरु शकते. या चार राशींचे उत्पन्न वाढू शकते तसेच, ते जे काही काम करायला घेतील त्यामध्ये त्यांना यश मिळू शकते. उद्या १५ मे २०२३ रोजी सकाळी ८ वाजून ३०मिनिटांनी बुध मंगळाच्या अधिपत्याखाली असलेल्या मेष राशीत मार्गी होणार आहे. बुधाचे मार्गी होणं कोणत्या राशीसाठी फायदेशीर ठरु शकते, जाणून घेऊया.

मिथुन राशी –

मिथुन राशीठी बुधाचे राशी परिवर्तन उत्पन्नात वाढ करण्याचा योग तयार करत आहे. त्यामुळे या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहू शकते. तसेच तुमच्या प्रेमजीवनातील गोडवा वाढू शकतो. तुमचे साथीदाराबरोबरचे सबंध पूर्वीपेक्षा चांगले होऊ शकतात. तुम्हाला नवीन काम सुरू करायचे असेल, तर हा काळ तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरु शकतो.

हेही वाचा- १५ मेपासून ‘या’ राशींच्या नशिबाला कलाटणी? सुर्यदेवाच्या कृपेने बक्कळ पैसा मिळण्याची शक्यता

कर्क राशी –

१० व्या स्थानी बुध मार्गी होणार असल्याने तुमच्या घरात शांतता नांदू शकते, ऑफिसमध्ये तुम्हाला मान-सन्मान मिळू शकतो. तसेच या काळात नोकरदारांना जास्त लाभ होऊ शकतो. तुमचा बॉस तुमच्यावर खूश होण्याची शक्यता आहे, तसेच करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. तुमचे आरोग्यही चांगले राहू शकते शिवाय तुमच्यावर सूर्यदेवाची कृपाही राहू शकते.

कन्या राशी –

हेही वाचा- कोट्यधीशांचे नशीब घेऊन जन्म घेतात ‘या’ व्यक्ती? तुमच्या वाढदिवसाची तारीख व धनलाभाचा मार्ग काय?

कन्या राशीच्या ८ व्या स्थानी बुध मार्गी होऊन आर्थिक लाभ देऊ शकतो. या काळात तुमची ऑफिसमध्ये कामगिरी चांगली राहू शकते. तसेच तुम्हाला पुढे जाण्याची संधी मिळू शकते. यासोबतच उद्या होणार्‍या सूर्य गोचरचा पूर्ण लाभही तुम्हाला होऊ शकतो.

धनु राशी –

धनु राशीच्या ५ व्या स्थानी बुध मार्गी होणार आहे, या काळात तुमची नोकरी बदलण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला योग्य पर्याय मिळू शकतो. व्यवसायातही शुभ परिणाम आणि नफा मिळण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)