Navpancham Rajyog 2025: ग्रहांची चाल बदलली की नशिबाची दिशादेखील बदलते असं म्हणतात. सध्या असाच एक दुर्मीळ आणि प्रभावी योग तयार होतो आहे, शनी आणि सूर्य यांचा नवपंचम राजयोग. ३० वर्षांनंतर हा शक्तिशाली संयोग घडतोय, ज्यामुळे काही निवडक राशींच्या जीवनात मोठे सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे.

सूर्य सध्या कर्क राशीत आहे आणि १६ नोव्हेंबरला तो वृश्चिक राशीत प्रवेश करेल. त्याच वेळी शनी मीन राशीत वक्री अवस्थेत राहणार आहे. हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून नवम (९वा) आणि पंचम (५वा) स्थानी असल्याने नवपंचम राजयोग तयार होतोय, जो विशेषतः निवडक राशींना भरघोस लाभ देऊ शकतो. कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी पाहूयात..

३० वर्षांनंतर ‘या’ राशींवर शनी-सूर्याची विशेष कृपा!

मेष (Aries):

या राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे. कष्टांना योग्य फळ मिळेल, आपल्याला या काळात प्रचंड व अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो. आपल्याला शेअर बाजारात गुंतवणुकीचा लाभ होऊ शकतो .आर्थिक स्थितीत सुधारणा आणि कौटुंबिक सुख वाढेल. अनेक वर्षांपासून असलेल्या अडचणी दूर होतील. यशस्वी व्यावसायिक संधी मिळतील आणि आरोग्य उत्तम राहील. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. सुखसोयी वाढू शकतात. आदर आणि प्रतिष्ठा मिळू शकेल.

सिंह (Leo):

सूर्य या राशीचा स्वामी असल्यामुळे सिंह राशीच्या लोकांना हा योग विशेष शुभ ठरेल. बुद्धिमत्ता आणि नेतृत्वगुणांमुळे व्यवसायात मोठं यश मिळेल. आर्थिकदृष्ट्या उन्नती होईल, नवीन उत्पन्न स्रोत निर्माण होऊ शकतात. बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या आर्थिक संकटातून दिलासा मिळू शकेल. तुम्हाला नव्या नोकरीची ऑफर येऊ शकते. बँक बॅलेन्स वाढू शकतो, कौटुंबिक समस्या मिटतील आणि मानसिक समाधान लाभेल. भाग्यपूर्ण घटनांनी जीवनाची दिशा बदलू शकते. आपल्याला वाडवडिलांकडून प्रचंड धनलाभ होऊ शकतो.

वृश्चिक (Scorpio):

ही राशी म्हणजे जिथे सूर्य प्रवेश करतो, त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी हा काळ परिवर्तनाचा ठरेल. नवीन नोकरी, बढती आणि वेतनवाढ याचे योग आहेत. आपल्या इच्छा पूर्ण करणारा हा लाभदायक काळ असू शकतो. तसेच आपल्या आर्थिक मिळकतीचे स्रोत वाढू शकतात. संतानसुख, उत्पन्नात वाढ आणि व्यावसायिक यश दिसून येईल. शेअर बाजार व गुंतवणुकीत लाभ होण्याची शक्यता आहे. भविष्यासाठी धन संचयाची संधी मिळेल. अविवाहित व लग्न इच्छुक व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)