Budh Margi 2023: बुध हा वैदिक ज्योतिषशास्त्रात शुभ ग्रह मानला जातो. बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार देखील म्हणतात. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध शुभ प्रभावात असतो. त्यांना कशाचीही कमतरता भासत नाही. तसंच ज्या राशींच्या कुंडलीत बुध ग्रह अशुभ स्तिथीत असतात त्यांना याचे नकारात्मक परिणाम भोगावे लागतात.

ज्योतिषशास्त्रानुसार बुध हा ग्रह बुद्धिमत्ता, तर्क, संवाद इत्यादींचा कारक मानला जातो. सूर्य आणि शुक्र हे बुधचे अनुकूल ग्रह मानले जातात तर चंद्र आणि मंगळ हे त्याचे शत्रू ग्रह मानले जातात. बुधवार हा दिवस बुध ग्रहाला समर्पित आहे. त्याचबरोबर असे मानले जाते की ज्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध चढत्या घरात असतो. ती व्यक्ती दिसायला सुंदर असते आणि त्या व्यक्तीचे डोळे तेजस्वी असतात. यासोबतच अशा लोकांची बुद्धीही तीक्ष्ण असते, असा समज आहे.

‘या’ दोन राशींवर बुधाची विशेष कृपा असते

मिथुन राशी

ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशी ही बुधदेवाची आवडती रास आहे. या राशीवर बुद्ध देवाची विशेष कृपा राहते. या राशीला येत्या काळात व्यवसायात किंवा नोकरीच्या ठिकाणी बुधाची साथ मिळणार आहे. तसंच आर्थिक स्थितीही चांगली राहील. नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी हा काळ शुभ ठरणार आहे. तसंच समाजात मान सन्मान मिळेल. यासोबतच नोकरीच्या ठिकाणी वारिष्ठांकडून कौतुक होईल.

( हे ही वाचा: १५ दिवसांनी ‘या’ राशी होणार श्रीमंत? शनिच्या राशीत बुध प्रवेश करताच मिळू शकतो प्रचंड पैसा)

कन्या राशी

कन्या राशी ही बुध देवाची आवडती रास आहे. या राशीला नेहमीच बुधदेवाची साथ मिळते. येत्या काळात या राशीला नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. तसंच ज्या लोक व्यवसाय करत असतील त्यांना यावेळी चांगला नफा होणार आहे. या राशीला येत्या काळात बुधदेव धनलाभाची संधी उपलब्ध करून देतील. ज्यामुळे आर्थिक स्तिथीत सुधारणा होणार आहे. शिक्षण घेणाऱ्यांसाठी हा काळ चांगला असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(वरील बातमी ही माहिती आणि गृहितके यांवर आधारित आहे)