Shani Margi And Guru Vakri 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार नोव्हेंबर महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कारण- या महिन्यात अनेक मोठे ग्रह त्यांच्या गतीत बदल करणार आहेत. त्यात सर्वांत विशेष घटना म्हणजे देवगुरू बृहस्पती (गुरू) आणि दंडाधिकारी शनिदेव (शनी) यांच्या गतीतील बदल. ११ नोव्हेंबर रोजी देवगुरू बृहस्पतू आपल्या कर्क राशीत वक्री होणार, तर २८ नोव्हेंबर रोजी शनिदेव मीन राशीत मार्गी होणार आहेत.

ज्योतिषशास्त्रानुसार गुरू आणि शनी या दोन्ही ग्रहांच्या गतीतील बदल हा नेहमीच जीवनावर खोल परिणाम करणारा मानला जातो. पण, यावेळी हा संयोग अधिक दुर्मीळ आहे. कार- असा योग तब्बल ५०० वर्षांनंतर घडत आहे. त्यामुळे या ग्रहबदलांमुळे काही राशींवर धनलाभ, करिअरमधील प्रगती आणि मानसिक स्थैर्य मिळण्याचे संकेत आहेत, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. चला पाहूया कोणत्या राशींना हा काळ लाभदायक ठरू शकतो.

मिथुन (Gemini)

गुरूच्या वक्री अवस्थेमुळे आणि शनिच्या मार्गी गतीमुळे मिथुन राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात नवीन ऊर्जा मिळू शकते. कोणतंही नवीन प्रोजेक्ट, व्यावसायिक योजना किंवा गुंतवणुकीचं नियोजन करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल, प्रतिष्ठेत वाढ होईल. निर्णयक्षमता आणि आत्मविश्वास वाढेल. प्रगतीची द्वारे खुली होऊ शकतात.

मकर (Capricorn)

गुरू वक्री आणि शनी मार्गी होणे मकर राशीच्या लोकांसाठी हा धन आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने सकारात्मक काळ मानला जातो. दीर्घकाळापासून अडकलेला पैसा परत येण्याची शक्यता आहे. धनसंपत्तीची कमतरता दूर होऊ शकते. आर्थिक स्थैर्य प्राप्त होऊ शकते. संपत्ती, जमीनजुमल्याशी संबंधित व्यवहारात अनुकूलता दिसू शकते. कौटुंबिक पातळीवरही आर्थिक विषयांमध्ये दिलासा मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहू शकतो.

कुंभ (Aquarius)

कुंभ राशीच्या व्यक्तींना हा काळ प्रगती आणि आत्मविकासाचा मानला जातो. गुरूची वक्री चाल विचारशक्ती तीक्ष्ण करेल. त्यामुळे दीर्घकालीन योजना अधिक प्रभावीपणे आखता येतील. शनीची मार्गी लागलेली अवस्था मेहनतीला योग्य दिशा देईल. कार्यस्थळी नवे जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. काहींना पदोन्नती किंवा नव्या व्यवसायाची संधी मिळू शकतात. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक अडचणीतून जात असलेल्या लोकांनाही या काळात मोठा दिलासा मिळू शकतो.

ज्योतिषशास्त्रीय संकेत काय सांगतात?

गुरू आणि शनी हे दोन्ही ग्रह कर्म, नियोजन, संयम व ज्ञानाशी संबंधित आहेत. त्यामुळे या काळात मेहनत घेणाऱ्यांना फळ मिळण्याची शक्यता, तसेच धन, प्रतिष्ठा व आत्मविश्वास वाढण्याची चिन्हे दिसू शकतात. मात्र, हा काळ प्रत्येकासाठी वेगळा परिणाम देऊ शकतो. त्यामुळे वैयक्तिक कुंडलीनुसार परिणाम भिन्न असतील.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)