Why gold is bought on Akshaya Tritiya : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा मुहूर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. हिंदू धर्मात या मुहूर्ताला विशेष महत्त्व आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने, वाहन, घर, दुकान, फ्लॅट, प्लॉट इत्यादी खरेदी करणे शुभ मानले जाते. यंदा अक्षय्य तृतीया २२ एप्रिलला म्हणजेच शनिवारी साजरी होणार आहे. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय्य तृतीया साजरी करण्याची परंपरा आहे. या दिवशी मोठ्या संख्येने लोक सोने खरेदी करतात. पण अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणे शुभ का मानले जाते? यामागचे कारण काय आहे? जाणून घेऊ…

ज्योतिषाचार्यांच्या मते, पौराणिक कथा आणि आख्यायिकांनुसार, ब्रह्मदेवाचा पुत्र अक्षय याचा जन्म वैशाख शुक्ल तृतीयेला झाला. म्हणूनच या तिथीला अक्षय्य तृतीया म्हणतात. या तिथीला कोणतेही शुभ कार्य केले तरी त्याचे चौपट फळ अक्षय्य राहते. मुळात अक्षय या शब्दाचा अर्थच कधीच क्षय न पावणारा, म्हणजे नाश न पावणारा, असा होतो. सोने आणि दागिने हे लक्ष्मीचे भौतिक रूप मानले जाते, ज्यांच्यावर लक्ष्मीमातेचा विशेष आशीर्वाद असतो. या दिवशी सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. यासोबतच सोने खरेदी करून परिधान केल्याने अकाली मृत्यू होत नाही.

अक्षय्य तृतीयेला पौराणिक महत्त्व आहे. या दिवशी सतयुगापासून त्रेतायुग सुरू झाल्याचे मानले जाते. द्वापरयुगाचा शेवट आणि महाभारत युद्धाचा शेवटही या दिवशी झाला. भगवान विष्णूचा नर-नारायण अवतार, हयग्रीव, परशुराम यांचा अवतारही याच तिथीला झाल्याची आख्यायिका सांगितली जाते.

अक्षय्य तृतीयेला सोनेखरेदीचा शुभ मुहूर्त

ऋषिकेश पंचांगानुसार, अक्षय्य तृतीयेला सोनेखरेदीला विशेष महत्त्व आहे. शनिवार, २२ एप्रिल रोजी सकाळी ८:०४ वाजल्यापासून रविवार, २३ एप्रिल सकाळी ८ वाजेपर्यंत सोनेखरेदीचा शुभ मुहूर्त आहे. या दिवशी दागिने खरेदी करून परिधान केल्यास अकाली मृत्यूचा धोका कमी होतो. हा २४ तासांचा काळ त्रेतायुगाचा योग बनवतो. यामध्ये भगवान परशुरामांचा जन्म झाला. हा मुहूर्त वर्षातून एकदा येतो.

ऋषिकेश पंचांगनुसार, अक्षय्य तृतीया शनिवार, २२ एप्रिल रोजी सकाळी ८.०४ पासून सुरू होत असून रविवार, २३ एप्रिल रोजी सकाळी ८.०८ पर्यंत राहील. या शुभ योगात दान करणे आणि स्नान करणे खूप महत्त्वाचे आहे. याने पुण्य प्राप्त होते आणि संकटे दूर होतात, असे मानले जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)