Akshaya Tritiya 2024: वैदिक ज्योतिष पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. २०२४ मध्ये १० मे ला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त जुळून आला आहे. या दिवशी केलेल्या गोष्टी व त्याचा प्रभाव अक्षय्य म्हणजेच कधीही न संपणारा असतो असे मानले जाते. अक्षय्य तृतीया हा अत्यंत पवित्र अशा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून ओळखला जातो. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार १० मे ला यंदा अनेक शुभ योग जुळून येणार आहेत. या दिवशी गजकेसरी राजयोग तसेच मंगळ व बुधाच्या मिलनाने मीन राशीत धन योग सुद्धा निर्माण होत आहेत. १० मे ला रवी योग सुद्धा तयार होत आहे. या राजयोगांमुळे राशी चक्रातील चार राशींच्या नशिबात प्रचंड यश, धन-संपत्ती, पद-प्रतिष्ठा येण्याची सुरुवात होणार आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला माता लक्ष्मी करोडपती होण्याची सुद्धा संधी देऊ शकते. या चार राशी कोणत्या हे पाहूया..

अक्षय्य तृतीयेपासून ‘या’ ४ राशी होतील करोडपती?

वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)

वृषभ राशीच्या मंडळींना अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त लाभदायक असणार आहे. या राशीच्या मंडळींना मनसोक्त आनंद लुटण्याची व यशस्वी आयुष्य अनुभवण्याची संधी मिळू शकते. आर्थिक मिळकतीचे स्रोत वाढतील. आर्थिक स्थितीत सुधारणा आल्याने मानसिक आरोग्य सुद्धा स्थिर व सबळ राहील. व्यवसायातून प्रचंड मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीवर भर द्या, सुरुवातीचे काही दिवस कठीण जातील, पण नंतर यश लाभत राहिल.

मिथुन रास (Gemini Rashi Bhavishya)

मिथुन राशीच्या मंडळींना अक्षय्य तृतीयेला शुभ वार्ता मिळू शकते. आपल्या बँक बॅलन्ससहित खर्चाचा आकडा वाढवणारा असा हा कालावधी असेल. तुमच्या मनाला व शरीराला आराम देण्यासाठी पैसे खर्च करण्यास सक्षम व्हाल. कामाच्या ठिकाणी तुमचे हितशत्रू दूर होतील. नोकरदार मंडळींना पदोन्नतीसह पगारवाढीचा सुद्धा फायदा होऊ शकतो. अडकून पडलेली कामे मार्गी लागतील.

तूळ रास (Libra Rashi Bhavishya)

तूळ राशीच्या लोकांसाठी १० मे नंतर पुढील कालावधी नशिबाला चमक देणारा सिद्ध होऊ शकतो. आयुष्यात सुख- समृद्धी लाभू शकते. समाजात मान- सन्मान वाढीस लागेल. नोकरदार मंडळींना कामाच्या ठिकाणी आपले म्हणणे सिद्ध करता येईल त्यामुळे तुमच्याविषयीची मतं बदलू शकतात. विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण किंवा नोकरी करण्याची संधी मिळू शकते.

हे ही वाचा<< आज महाअष्‍टमीपासून वर्षभर ‘या’ ५ राशींच्या घरी नांदणार लक्ष्मी; सिद्धी व रवी योग तुमच्या राशीला काय देणार?

धनु रास (Sagittarius Rashi Bhavishya)

धनु राशीच्या व्यायवसायिकांना किंवा व्यापाऱ्यांना अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त शुभ ठरू शकतो. गुंतवणुकीतून मोठा फायदा होण्याची चिन्हे आहेत. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वाडवडिलांच्या संपत्तीची सुद्धा मदत होऊ शकते. कौटुंबिक नाती सुधारतील. वैवाहिक आयुष्यात गोडवा वाढून तुम्हाला भरभराटीसाठी जोडीदाराची मदत मिळू शकते. विवाह इच्छुक मंडळींना चांगले स्थळ चालून येऊ शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)