२६ सप्टेंबर २०२२ पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे. आदिशक्तीच्या उपासनेचा हा उत्सव असून नवरात्रीत देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. शारदीय नवरात्री २५ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत चालणार आहे. घटस्थापनेचा मुहूर्त सकाळी ६ वाजून १७ मिनिटे ते ७ वाजून ५५ मिनिटांपर्यंत असून दुपारचा मुहूर्त सकाळी ११ वाजून ५४ मिनिटे ते दुपारी १२.४२ मिनिटांपर्यंत आहे.
नवरात्रीमध्ये देवीची पूजा करण्याचे कठोर नियम आहेत. असे मानले जाते की नवरात्रीमध्ये काही विशेष कामे निषिद्ध आहेत. अशी कामे केल्याने देवी मातेचा कोप होऊ शकतो. शारदीय नवरात्र हा अत्यंत पवित्र सण आहे. अशी मान्यता आहे की यावेळी केवळ सात्विक अन्न खावे, दाढी, केस, नखे कापू नये, व्रतधारी ब्रह्मचर्य पाळावे, मादक पदार्थांचे सेवन करू नये.
यावेळी शारदीय नवरात्रीमध्ये दोन अतिशय शुभ संयोगामध्ये देवी दुर्गेचे आगमन होणार आहे. शुक्ल योग २५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजून ६ मिनिटे ते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच २६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजून ६ मिनिटांपर्यंत राहील. त्याचबरोबर, २६ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ८ वाजून ६ मिनिटांनी ब्रह्मयोग तयार होत आहे, जो दुसऱ्या दिवशी २७ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजून ४४ मिनिटांपर्यंत राहील.
घटस्थापना व देवपूजेसाठी गंगाजल, जव पेरणीसाठी रुंद तोंडाचे मातीचे भांडे, स्वच्छ माती, सात प्रकारचे धान्य, झाकण असलेला मातीचा किंवा तांब्याचा कलश, कलव, सुपारी, गंगाजल, दुर्वा, वेलची, सुपारी, मिठाई, गुलाल, आंबा किंवा अशोकाची पाने, लाल कापड, नारळ, कापूर, अक्षत, लाल फूल, सिंदूर, लवंग, अत्तर, नाणे या सामग्रीचा वापर केला जातो.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)