अंकज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीचा मूलांक त्याच्या जन्मतारीखेशी जोडलेला असतो. आपल्या जन्माच्या तारखेतील अंकांची बेरीज करून मिळणारा हा मूलांक केवळ आपला स्वभाव, विचारसरणी आणि निर्णयक्षमता नव्हे, तर आपल्या भाग्यही दर्शवतो. विशेष म्हणजे काही मूलांकांवर देवी लक्ष्मीची कृपा असते. त्यापैकी एक म्हणजे मूलांक ६, ज्याचा स्वामी शुक्र ग्रहाचा आहे.

देवी लक्ष्मीची कृपा असलेला मूलांक

शुक्र ग्रह प्रेम, सौंदर्य, कला, ऐश्वर्य आणि भोगविलास यांचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे ६, १५ किंवा २४ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक ६ ठरतो. अशा मुलींवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा असल्याचे मानले जाते. या मुली जन्मतःच आकर्षक, सुसंस्कृत आणि सौंदर्यवान असतात. त्यांच्या भोवती एक नैसर्गिक तेज असते जे लोकांना सहज आकर्षित करते.

धन आणि वैभवाचा वर्षाव

मूलांक ६ असलेल्या मुलींच्या आयुष्यात धन, ऐश्वर्य आणि भौतिक सुखसुविधांची कमी कधीच भासत नाही. त्यांना स्वतःसाठीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबासाठीसुद्धा भाग्यवर्धक मानले जाते. त्यांच्या प्रयत्नांतून घरात समृद्धी, आनंद आणि ऐश्वर्याचे वातावरण टिकून राहते. या कन्या आर्थिक बाबतीत हुशार असतात, पण कधी कधी भावनांच्या आहारी जाऊन जास्त खर्च करतात.

सौंदर्याने परिपूर्ण आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व

शुक्राचा प्रभाव असल्याने मूलांक ६ च्या मुली सौंदर्यप्रिय आणि कलात्मक असतात. त्यांना संगीत, नृत्य, फॅशन, डिझायनिंग, इंटीरियर डेकोरेशन अशा सर्जनशील क्षेत्रांत विशेष यश मिळते. त्यांच्या मेहनतीमुळे आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे त्या लोकांच्या मनात विशेष स्थान मिळवतात.

स्वभाव आणि नात्यांतील स्थैर्य

या मुली स्वभावाने शांत, भावनिक आणि संवेदनशील असतात. त्या विश्वास जिंकण्यात पटाईत असतात. नात्यांप्रती त्यांची निष्ठा प्रबळ असते आणि त्या आपल्या प्रियजनांसाठी नेहमी समर्पित राहतात. त्यांच्या उपस्थितीमुळे घरातील वातावरण सकारात्मक राहते.

भाग्यवान जीवन

अंकज्योतिषानुसार, मूलांक ६ असलेल्या मुलींच्या जीवनात स्थैर्य, प्रेम आणि समृद्धी असते. त्यांच्या जीवनात कधी ना कधी मोठे धनयोग बनतात आणि त्या स्वतःच्या प्रयत्नांनी समाजात आदर मिळवतात. त्यांचा सौंदर्य आणि दयाळूपणाचा संगम त्यांना खरं लक्ष्मीस्वरूप बनवतो.