Mars Transit: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाचे ठराविक काळानंतर राशीपरिवर्तन होत असते. हे राशीपरिवर्तन करणारे ग्रह त्या राशीत आधीपासून विराजमान असणाऱ्या ग्रहांसोबत मिळून योग निर्माण करतात. २३ एप्रिल रोजी मंगळ ग्रहाने मीन राशीत प्रवेश केला आहे. शिवाय त्यानंतर १ जून रोजी मंगळ मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे, ज्यामुळे काही राशीच्या व्यक्तींना अनेक आर्थिक लाभ होतील.

मंगळ करणार मेष राशीत प्रवेश

ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला साहस, ऊर्जा, शक्ती, पराक्रमाचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे जेव्हा जेव्हा मंगळ राशीचे राशीपरिवर्तन होते, त्यावेळी त्याचा प्रभाव इतर राशींवरही होतो. २३ एप्रिल रोजी मंगळ ग्रहाने मीन राशीत प्रवेश केला असून १ जूनपासून तो आपल्या स्वराशी असलेल्या मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे. मंगळाच्या या राशीपरिर्वतनाने तीन राशींना अनेक लाभ होतील.

हेही वाचा : येत्या ४ दिवसांनी ‘या’ राशींना मिळणार चांगला पैसा? मेष राशीत शुक्रदेव अस्त होताच बँक बँलेन्समध्ये होऊ शकते वाढ

कर्क

मंगळ ग्रहाचा मेष राशीत प्रवेश होताच कर्क राशींच्या व्यक्तींना अनेक आर्थिक लाभ होतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी उत्तम काळ सिद्ध होईल. व्यवसायात अधिक वाढ होईल. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. आकस्मिक धनलाभाचे योग निर्माण होतील.

सिंह

मंगळ ग्रहाचा मेष राशीतील प्रवेश सिंह राशींसाठीदेखील प्रगतिकारक ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचला. गुंतवणूक करण्यासाठी उत्तम काळ आहे. वैवाहिक जीवन सुखमय राहील.

धनु

मंगळ ग्रहाचे राशीपरिवर्तन धनु राशीच्या व्यक्तींसाठीदेखील लाभदायी ठरेल. या काळात आकस्मिक धनलाभ होतील. जोडीदाराचा सहयोग प्राप्त होईल. नोकरदारांचे वरिष्ठांकडून कौतुक होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)