Mercury Transit in Libra 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, बुध हा बुद्धी, संवाद, व्यापार आणि तर्कशक्तीचा कारक ग्रह मानला जातो. बुध ग्रहाने तूळ राशीत प्रवेश केला आणि त्यानंतर आकाशातील ग्रहस्थितीत मोठी उलथापालथ घडली आहे. आता बुध २४ ऑक्टोबरपर्यंत तूळ राशीत भ्रमण करणार असून, त्या काळात काही राशींच्या लोकांचं नशीब अक्षरशः पालटणार आहे. त्यानुसार काही राशींच्या लोकांना अफाट यश, पैसा व प्रतिष्ठा देऊन जाणार आहे. काहींना अचानक आलेल्या संधी थक्क करून सोडणार आहेत. चला तर पाहूयात कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

‘या’ राशींच्या नशीबात मोठा बदल!

मकर (Capricorn)

बुधाचा राशिबदल मकर राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ परिणाम घेऊन आला आहे. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ आता तुम्हाला मिळू शकतो. नशीब तुमच्या पाठीशी उभं राहिलंय, असं तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल. नोकरीत वरिष्ठ अधिकाऱ्यांची कृपादृष्टी लाभेल; तर काहींना नवीन जबाबदाऱ्या आणि बढती मिळू शकते. स्पर्धकांवर मात करताना तुम्ही सर्वांचं लक्ष वेधून घ्याल. व्यावसायिकांसाठी ही सोनेरी वेळ आहे. तुमच्या आर्थिक स्थितीत अचानक सुधारणा होऊ शकते, मोठ्या करारांवर शिक्कामोर्तब होईल. कुटुंबीयांचा पाठिंबा मिळेल, सन्मान व प्रतिष्ठेचं स्थान उंचावेल. एकूणच, मकर राशीच्या लोकांसाठी ही वेळ ‘भाग्याचा दरवाजा उघडणारी’ ठरू शकते.

कर्क (Cancer)

हा काळ कर्क राशीच्या लोकांसाठीही समाधान देणारा ठरेल. बराच काळ चालू असलेल्या अडचणींना आता पूर्णविराम लागू शकतो. मित्रांच्या मदतीनं तुम्ही आपलं ध्येय गाठू शकता. आईसोबतचे ताणलेले संबंध सुधारतील, घरात पुन्हा आनंदाचे क्षण येतील. जमीन-जुमल्याचे व्यवहार फायदेशीर ठरतील, घर विक्री किंवा खरेदीसाठी योग्य वेळ आहे. उच्चभ्रू लोकांशी नवी ओळख होईल, जी पुढे आयुष्याला नवं वळण देऊ शकते. एकूणच, कर्क राशीवाल्यांसाठी बुधाचं हे भ्रमण म्हणजे ‘शांततेतून यशाकडे’ जाणारा मार्ग आहे.

वृषभ (Taurus)

बुधाचे राशी परिवर्तन वृषभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतो. मित्र आणि कुटुंबीयांचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा लाभेल. आर्थिक अडचणींवर मात करू शकाल, बँक कर्जासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. कर्जमुक्त होण्याचा मार्ग खुला होईल. कला, साहित्य, लेखन किंवा सर्जनशील क्षेत्रातील लोकांना विशेष ओळख आणि पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. मान-सन्मान वाढेल आणि लोक तुमच्याकडे नव्या नजरेने पाहतील. एकूणच, बुध या राशीवाल्यांसाठी ‘यशाचा सुवर्णकाळ’ घेऊन येत आहे.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)