Dainik Rashibhavishya Live Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणार्या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीचे आज आपण जाणून घेणार आहोत.
आजचे राशिभविष्य ४ मे २०२५ : जाणून घ्या आजचे राशी भविष्य आणि त्यासंबंधित विविध घडामोडी.
आजचे मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope in Marathi)
जुनी इच्छा पूर्णत्वास येईल. केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. उत्तम व्यावसायिक लाभ मिळेल. थोरांचा मोलाचा सल्ला मिळेल. सामुदायिक वादविवादापासून दूर राहावे
आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope in Marathi)
निराशाजनक विचार करू नये. आत्मविश्वास सोडून चालणार नाही. आळस बाजूला सारून कामे करावीत. बोलताना तिखट शब्दांचा वापर कमी करावा. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नये.
आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope in Marathii)
कौटुंबिक गोष्टींना अधिक प्राधान्य द्याल. परिस्थितीला समजून घेण्याचा प्रयत्न करावा. टीकेमुळे निराश होऊ नका. मनाची चंचलता अध्यात्माने दूर करण्याचा प्रयत्न करावा. अधिकारांची जाणीव ठेवावी.
आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope in Marathi)
वैवाहिक सौख्याकडे लक्ष द्यावे. भाजणे, खरचटणे यांसारखे त्रास संभवतात. दिवसभर कामाचा त्रास राहील. प्रवासात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. संभाषण कौशल्य दाखवण्याची संधी लाभेल.
आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope in Marathi)
कामात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. चटकन रागवू नका. घाई-घाईने कोणतेही कृती करू नका. पित्त विकाराचा त्रास जाणवेल. अवाजवी अपेक्षा बाळगू नका.
आजचे तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope in Marathi)
मुलांचे स्वतंत्र विचार समजून घ्यावेत. मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. मैदानी खेळाची आवड जोपासाल. कामे वेळेत पार पडतील. जमिनीच्या व्यवहारातून लाभ संभवतो.
आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope in Marathi)
भांडखोर लोकांपासून दूर राहावे. कामाचा ताण जाणवेल. वैचारिक दृष्टिकोन बदलून पहावे. उष्णतेचे विकार संभवतात. तुमच्याबद्दल लोकांचा गैरसमज होऊ शकतो.
आजचे सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope in Marathi)
प्रकृतीची हेळसांड करू नका. वेळेचे महत्त्व लक्षात घ्यावे. कामातील लाभाकडे दुर्लक्ष नको. वरिष्ठांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल. प्रतिकूलतेतून मार्ग काढावा.
आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope in Marathi)
क्षुल्लक वाद वाढवू नये. मनातील इच्छा पूर्ण करून घ्याल. जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. सरकारी कामे पुढे सरकतील. जोडीदाराची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करावा.
Saptahik Ank Rashifal 5 To 11 May 2025: या आठवड्यात ३ मूलांकच्या लोकांना मिळेल नवी नोकरीची सधी, अचानक होईल धनलाभ, जाणून घ्या साप्ताहिक अंक ज्योतिष
आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope in Marathi)
कामानिमित्त दिवसभर बाहेर राहाल. क्षणिक सौख्यात रमून जाल. चोरांपासून सावध राहावे. जामीनकीच्या व्यवहारात दक्षता बाळगावी. वरिष्ठ तुमच्यावर नाराज होऊ शकतात.
१० दिवसांनी देवगुरु घर सोडताच 'या' राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा? १३ महिन्यांनंतर गोचर होताच देवगुरुच्या कृपेने आयुष्यात होणार चमत्कार!
७ मे पासून 'या' तीन राशींचे लोक होऊ शकतात श्रीमंत, बुध गोचरमुळे मिळेल अपार पैसा, धनसंपत्ती अन् यश
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope in Marathi)
आवडी निवडीबाबत लक्ष द्याल. हसत-हसत आपले मत मांडाल. गोड बोलून कार्यभाग साधता येईल. आवडीचे पदार्थ खायला मिळतील. लोकांवर तुमची उत्तम छाप पडेल.
पैसाच पैसा! गुरू आणि शुक्र निर्माण करणार गजलक्ष्मी राजयोग; 'या' तीन राशींचे लोक बक्कळ पैसा अन् भौतिक सुख प्राप्त करणार
आजचे मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope in Marathi)
कामाची धावपळ वाढू शकते. गुंतवणुकीचा चांगला पर्याय निवडाल. कामातील मोबदल्याकडे लक्ष द्यावे. मौल्यवान वस्तु खरेदी कराल. स्वकष्टावर अधिक भर द्याल.
अवघ्या ३ दिवसांत झटक्यात पालटणार 'या' राशींचे नशीब? १२ वर्षांनी 'बुधादित्य राजयोग' घडून आल्याने कोणाच्या पदरात सुख?
Daily Horoscope : रविवारी बदलणार 'या' राशींचे नशीब; कोणाच्या प्रगतीचे उघडणार दार तर कोणाला लाभेल सोन्यासारखं आयुष्य; वाचा तुमचे राशिभविष्य
May Born Personality Traits : मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो? वाचा त्यांचा लकी नंबरपासून व्यक्तिमत्वापर्यंत; सर्वकाही एका क्लिकवर
Today Horoscope 4 May 2025 (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)