Shukra Nakshatra Gochar 2025: वैदिक ज्योतिषानुसार ग्रह एका ठरावीक वेळेनंतर राशीसोबत नक्षत्रही बदलतात, ज्याचा परिणाम माणसाच्या आयुष्यावर आणि पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात होतो. २३ ऑगस्ट रोजी धनाचे कारक शुक्र ग्रह पुष्य नक्षत्रात प्रवेश करणार आहे. पुष्य नक्षत्राचे स्वामी शनीदेव आहेत, जे कर्माचे फळ देणारे व न्यायाचे देवता मानले जातात. वैदिक ज्योतिषात शुक्र आणि शनी एकमेकांचे मित्र मानले गेले आहेत. अशा परिस्थितीत शुक्र ग्रहाच्या नक्षत्र बदलामुळे काही राशींना सुवर्णसंधी मिळू शकते. या राशींना करिअर आणि व्यवसायात लाभ होऊ शकतो. चला तर मग पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
कर्क राशी (Cancer Horoscope)
तुमच्यासाठी शुक्र ग्रहाचा नक्षत्र बदल फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुमच्या व्यक्तिमत्वात चांगला बदल दिसून येईल. शुक्र ग्रह तुमच्या राशीच्या पंचम आणि बाराव्या घराचे स्वामी आहेत. त्यामुळे या काळात तुम्हाला मुलांबद्दल एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. तसेच तुम्ही या काळात पैसे बचत करण्यात यशस्वी ठराल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. याचबरोबर वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा होऊ शकतो. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. समाजात तुमचा सन्मान वाढेल. तसेच, विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन सुखद आणि आनंदी राहील. आणि अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.
तूळ राशी (Libra Horoscope)
शुक्र ग्रहाचा नक्षत्र बदल तुमच्यासाठी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकतो. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीच्या कर्मभावात संचार करत आहे. त्यामुळे या काळात तुमच्या कामधंद्यात चांगली प्रगती होऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांचे उत्पन्न वाढेल आणि पदोन्नतीची संधी मिळू शकते. व्यवसायात नवीन पार्टनरसोबत काम करण्याची संधी मिळेल आणि जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो. व्यापाऱ्यांना चांगला धनलाभ होऊ शकतो. तसेच नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी दिली जाऊ शकते.
कन्या राशी (Virgo Horoscope)
तुमच्यासाठी शुक्र ग्रहाचा नक्षत्र बदल अनुकूल ठरू शकतो. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीच्या उत्पन्न आणि लाभ स्थानात संचार करत आहे. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते. तसेच उत्पन्नाचे नवे-नवे मार्ग तयार होऊ शकतात. तुमची आर्थिक परिस्थितीही सुधारेल. गुंतवणुकीतून फायदा होईल. मुलांकडून काही शुभ बातमी मिळू शकते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)