Baba Vangas Predictions 2025- 26: जपानमध्ये त्सुनामीचा इशारा दिला गेला आहे. त्यानंतर जपानचे बाबा वेंगा म्हणून ओळखले जाणारे रियो तात्सुकी यांची भाकीत पुन्हा एकदा व्हायरल होत आहेत. जुलैच्या सुरुवातीला देखील त्यांनी जपानमध्ये येणाऱ्या त्सुनामीबाबत केलेल्या भाकीताची खूप चर्चा झाली होती. आता त्यांचे हे भाकीत खरे ठरत असल्याचे दिसत आहे.

रशियामध्ये भूकंप आल्यावर जपानमध्ये त्सुनामीबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. याच दरम्यान जपानी बाबा वेंगा यांच्या भाकीताची चर्चा सुरू आहे. रियो तात्सुकी, ज्यांना जपानी बाबा वेंगा म्हणून ओळखले जाते, त्यांनी त्यांच्या “फ्युचर आय सॉ” या पुस्तकात असा दावा केला होता की २०२५ मध्ये जपानमध्ये मोठी आपत्ती येऊ शकते. आता त्यांचे हे भाकीत खरे ठरत असल्याचे दिसत आहे. जुलैच्या सुरुवातीलाच रियो तात्सुकी यांचे हे भाकीत खूप चर्चेत होते. चला, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया…

जपानमधील आपत्तीबद्दल भाकीत (Baba Vanga Predictions Tsunami, Earthquake in Japan)

जपानी बाबा वेंगा यांनी त्यांच्या भविष्यवाणीत समुद्र उसळत असल्याचं दृश्य सांगितलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की समुद्र जोरात उसळेल आणि मोठमोठ्या लाटा उठतील. त्यांनी त्सुनामीचं केंद्र जपान, तैवान, इंडोनेशिया आणि नॉर्थ मरीयाना बेटं यांना जोडणाऱ्या भागात असं सांगितलं होतं. बुधवारी, ३० जुलै रोजी सकाळी रशियामध्ये ८.८ तीव्रतेचा जोरदार भूकंप झाला आणि त्याचा परिणाम जपानपासून अमेरिकेपर्यंत झाला. भूकंपानंतर रशिया आणि जपानमध्ये त्सुनामीच्या लाटा दिसून आल्या. जपानमध्ये हवामानाबाबत इशारा दिला गेला असून लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला आहे.

जपानी बाबा वेंगा यांनी या भविष्यवाणीच्या आधी कोविड-१९ बाबतही भाकीत केलं होतं, जे खरं ठरलं. त्यांच्या भाकीतांमध्ये १९९५ चा कोबे भूकंप, फ्रेडी मर्क्युरी यांचा मृत्यू, प्रिन्सेस डायना यांचा अपघात अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. याशिवाय त्यांनी असा दावा केला आहे की २०३० मध्ये कोविडचा एक अधिक धोकादायक प्रकार येईल, जो मागच्यावेळेपेक्षा जास्त नुकसान करेल. १९९९ साली तात्सुकी यांनी त्यांच्या भाकीतांवर एक पुस्तक प्रकाशित केलं होतं. त्यांची अनेक भाकीतं खरी ठरल्यानं आता पुन्हा त्यांच्या भाकीतांची चर्चा सुरू झाली आहे. रियो तात्सुकी यांनीच २०११ मध्ये जपानमध्ये आलेल्या त्सुनामीचा उल्लेख केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बल्गेरिया बाबा वेंगांची भविष्यवाणी (Baba Vanga Predictions 2026)

या सगळ्या भविष्यवाण्यांच्या दरम्यान, बल्गेरियाच्या बाबा वेंगा यांनी २०२६ सालाबाबत केलेली एक भविष्यवाणी सध्या खूप व्हायरल होत आहे. त्यांच्या भविष्यवाणीनुसार, २०२६ मध्ये एक मोठं आर्थिक संकट येईल, जे संपूर्ण जगाला हादरवून टाकेल. हे संकट राजकीय तणाव, तांत्रिक बदल किंवा पर्यावरणीय आपत्तीमुळे येऊ शकते. जगभरातील लोक या आर्थिक संकटामुळे खूप त्रस्त होऊ शकतात.