Baba Vanga 2026 Predictions: जगातील गूढशक्ती, भविष्यकथन आणि रहस्यमय भाकितांचा विषय निघाला की “बाल्कनची नॉस्ट्रॅडॅमस”म्हणून ओळखली जाणारी बाबा वेंगा यांचं नाव आजही पहिल्यांदा घेतलं जातं. दशकांपूर्वी या आंधळ्या बल्गेरियन साध्वीचं निधन झालं असलं तरी त्यांची भाकितं आजही लोकांना हादरवून सोडतात. विशेषत: २०२५ मध्ये घडलेल्या भीषण घटनेनंतर त्यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

२०२५ मध्ये काय भाकीत केलं होतं?

बाबा वेंगाने या वर्षासाठी केलेली भविष्यवाणी अत्यंत भीषण होती. त्यांनी “लोकसंख्या उद्ध्वस्त करणारे प्रचंड भूकंप”, “युरोपमध्ये उभा राहणारा मोठा संघर्ष” आणि “जगभर आर्थिक संकट” याचा इशारा दिला होता. त्यांच्या या तिन्ही भविष्यवाण्यांनी जगाला अनिश्चिततेच्या वादळात ढकललं.

खरी ठरलेली भविष्यवाणी!

आणि अगदी तसं घडलंही. म्यानमारमध्ये झालेल्या भीषण भूकंपात १,७०० हून अधिक लोकांचा बळी गेला. हा भूकंप नेमका त्यांच्या इशाऱ्याशी जुळून आल्याने पुन्हा एकदा लोकांचं लक्ष त्यांच्या भाकितांकडे वळलं आहे. त्याचबरोबर युरोपमध्ये अजूनही युक्रेन युद्ध सुरू आहे, राजकीय अस्थिरता, सीमा तणाव वाढले आहेत. अर्थव्यवस्थेच्या आघाडीवरही महागाई, व्यापारयुद्ध आणि आर्थिक उलथापालथ सुरू आहे, त्यामुळे बाबा वेंगाच्या इशाऱ्याला अनेकांनी अवास्तव नव्हे तर खरी चेतावणी मानायला सुरुवात केली आहे.

पण खरी धास्ती २०२६ ची!

२०२५ जितकं भयंकर होतं, तितकंच पुढचं वर्ष अधिक काळोख घेऊन येईल असा इशारा बाबा वेंगाने दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, २०२६ मध्ये युरोपमधून सुरू होणारं एक महायुद्ध संपूर्ण जग व्यापून टाकेल. हे युद्ध केवळ प्रदेशापुरतं मर्यादित राहणार नाही, तर ते अनेक देशांना चिरडून टाकेल, लोकसंख्या कोसळेल, अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होतील आणि मानवी संस्कृतीच्याही पाया हलवतील.

जगभर दहशतीचं सावट…

आजवर त्यांच्या अनेक भाकितांना लोकं “योगायोग” म्हणत आले होते, पण २०२५ मध्ये घडलेल्या भूकंपानंतर आणि चालू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर २०२६ चं भाकीत लोकांच्या मनात भीतीचं सावट निर्माण करतंय. खरंच बाबा वंगाचं हे भविष्य खरं ठरणार का? की हे फक्त एक मिथक ठरेल?

जग आता पुढच्या वर्षात काय घडतंय याकडे टक लावून पाहत आहे…

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)