Couple Perfect For Each other: ज्योतिषशास्त्रामध्ये ज्या प्रकारे कुंडली पाहून व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्व आणि आयुष्याबद्दल अंदाज वर्तवला जातो, त्याचप्रमाणे अंकशास्त्रामध्ये व्यक्तीच्या जन्माच्या तारखेवरून त्या व्यक्तीचे भविष्य, गुणांचे वर्णन केले जाते. अंकशास्त्रामध्ये मूलांक आणि भाग्यांक यांच्यावरून व्यक्तीचा स्वभाव, गुण, अवगुण, भविष्याबद्दल भाष्य केले जाते. दरम्यान, आज आपण अशा काही मूलांकांबद्दल जाणून घेणार आहोत, जे परफेक्ट पार्टनर ठरतात.

‘या’ मूलांकाचे लोक असतात परफेक्ट पार्टनर

मूलांक १

मूलांक १ वर सूर्याचे वर्चस्व असते. त्यामुळे या मूलांकाचे लोक अतिशय उत्साही, तेजस्वी व आत्मविश्वासू असतात. या मूलांकासाठी १, ३, ४, ५, ७ व ९ या मूलांकांचे लोक परफेक्ट पार्टनर ठरतात. त्यापैकी एका मूलांकाच्या व्यक्तीशी लग्न केल्यास या लोकांना करिअर, व्यवसायात यश मिळते. त्याशिवाय वैवाहिक जीवनही सुखमय राहते.

मूलांक २

मूलांक २ वर चंद्र ग्रहाचे वर्चस्व असते, त्यामुळे या मूलांकाचे लोक अतिशय संवेदनशील, भावनिक असतात. या मूलांकासाठी २, ४, ६ व ९ मूलांकांचे लोक परफेक्ट पार्टनर ठरतात. त्यापैकी एका मूलांकाच्या जोडीदाराशी लग्न केल्यास या लोकांचे वैवाहिक जीवनही आनंदी राहते.

मूलांक ३

मूलांक ३ वर गुरू ग्रहाचे स्वामित्व आहे. त्यामुळे या मूलांकाचे लोक हुशार आणि आनंदी असतात. या मूलांकासाठी १, ३, ५, ६, ७, ८ व ९ या मूलांकांचे लोक परफेक्ट पार्टनर ठरतात. त्यापैकी एका मूलांकाच्या जोडीदाराशी विवाह केल्यास नाते आयुष्यभर टिकते.

मूलांक ४

मूलांक ४ वर राहूचे वर्चस्व असते. त्यामुळे या मूलांकाचे लोक अतिशय लहरी स्वभावाचे आणि स्पष्ट वक्ते असतात. या मूलांकासाठी १, २, ४, ५, ७, ८ व ९ मूलांकांचे लोक परफेक्ट पार्टनर ठरतात. यापैकी एका मूलांकाच्या जोडीदाराशी लग्न केल्यास त्यांना करिअरमध्ये भरपूर यश मिळते.

मूलांक ५

मूलांक ५ वर बुधाचे स्वामित्व आहे. त्यामुळे या मूलांकाचे लोक अतिशय व्यवहारिक आणि बुद्धिमान असतात. या मूलांकासाठी १, ३, ४, ५, ७ व ८ या मूलांकांचे लोक परफेक्ट पार्टनर असतात. यापैकी एका मूलांकाच्या जोडीदाराशी लग्न केल्यास या लोकांचे वैवाहिक जीवनही आनंदी राहते.

मूलांक ६

मूलांक ६ वर शुक्राचे स्वामित्व आहे. त्यामुळे या मूलांकाचे लोक अतिशय सुंदर, आकर्षक व कलात्मक असतात. या मूलांकासाठी २, ३, ६ व ९ मूलांकांचे लोक परफेक्ट पार्टनर असतात. यापैकी एका मूलांकाच्या जोडीदाराशी लग्न केल्यास या लोकांचे वैवाहिक जीवनही सुखी राहते.

मूलांक ७

मूलांक ७ वर केतूचा प्रभाव असतो. त्यामुळे या मूलांकाचे लोक अतिशय जिज्ञासू आणि रचनात्मक असतात. या मूलांकासाठी ३, ४, ५, ७, ८ व ९ या मूलांकांचे लोक परफेक्ट पार्टनर असतात. यापैकी एका मूलांकाच्या जोडीदाराशी लग्न केल्यास या लोकांचे भाग्य उजळते.

मूलांक ८

मूलांक ८ वर शनीचा प्रभाव असतो. त्यामुळे या मूलांकाचे लोक मेहनती आणि शिस्तप्रिय असतात. या मूलांकासाठी ३, ४, ५, ७ या मूलांकांचे लोक परफेक्ट पार्टनर असतात. यापैकी एका मूलांकाच्या जोडीदाराशी लग्न केल्यास या लोकांचे वैवाहिक जीवन सदा सुखी राहते.

मूलांक ९

मूलांक ९ वर मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो. त्यामुळे या मूलांकाचे लोक अतिशय उत्साही, रागीट व परिश्रमी असतात. या मूलांकासाठी १, २, ३, ४, ६, ७ व ९ या मूलांकांचे लोक परफेक्ट पार्टनर असतात. यापैकी एका मूलांकाच्या जोडीदाराशी लग्न केल्यास या लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहते.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)